Flood in Chandrapur : वैनगंगा कोपली; ब्रम्हपुरी तालुक्यात भीषण पूरस्थिती

Flood in Chandrapur : वैनगंगा कोपली; ब्रम्हपुरी तालुक्यात भीषण पूरस्थिती
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर जिल्ह्यात गत दोन दिवसांपूर्वी आलेला संततधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे ब्रह्मपुरीत तालुक्यात आठवडाभरात दुसऱ्यांदा भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. ब्रह्मपुरी आरमोरी मुख्यमार्गासह तालुक्यातील काही गावांतील रस्ते बंद झाले आहे. (Flood in Chandrapur) पुरामुळे पुन्हा जनजीवन प्रभावित झाले आहे.

(Flood in Chandrapur) भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या काठावरील पिंपळगाव, खरकाडा, अहेरनवरगाव, रणमोचन, बेलगाव या गावांपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. १० आणि ११ ऑगस्टरोजी ब्रह्मपुरी तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. आता आठवडाभरात दुसऱ्यांदा पूर आला आहे. किन्ही येथील विद्युत उपकेंद्र पाण्याखाली गेले आहे. पुराचे पाणी वाढल्यास या उपकेंद्राला जोडलेली गावे अंधारात जाण्याची शक्यता आहे.

बेटाळा फाट्यावरील महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालय पाण्याखाली गेले आहे. या महाविद्यालयाच्या मागे असलेल्या शीतपेयाच्या कारखान्यातसुद्धा पाणी घुसले. ब्रह्मपुरी ते आरमोरी या मार्गावरील पुलावर पाणी असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद झाला आहे. ब्रह्मपुरी ते गांगलवाडी आरमोरी मार्ग बंद झाला आहे. लाडज, बेलगाव, बोळधा, कुडेसावली, हळदा, बरडकिन्ही, चिचगाव, बेटाळा, मालडोंगरी, नीलज, रूई, पाचगाव, खरकाडा, रणमोचन, किन्ही या गावांना पुराची झळ पोहोचली आहे. ब्रह्मपुरीत तालुक्यातील नदीकाठालगत असलेल्या शेतांमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news