हिंगोली,पुढारी वृत्तसेवा: औंढानागनाथ येथील बसस्थानकामधून अनेक वर्षांपासून गावातील सांडपान्याची नाली वहात होती. ती नाली सतत व अविरहत वाहत आहे. ही नाली बस स्थानकाच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारावरच असल्याने भाविक भक्तासह पर्यटक , प्रवासी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला वसेच आबालवृद्धांना ही नाली ओलांडून पुढे जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता. तर या नालीतील घाण पाण्यात पाय बुडवून बसस्थानकामधे प्रवेश करावा लागत आहे. या पडलेल्या नालीमुळे अनेक वेळा बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
तर ही गावातील सांडपाणी नाली असल्याने बांधायची कुणी किंबहुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ की सार्वजनिक बांधकाम विभाग की नगरपंचायत यावर हि अनेक वेळा खलबते झाली. मात्र यादरम्यान औंढानागनाथ येथील सर्वच पत्रकार यांनी ही बातमी लावुन धरल्याने अखेर या नालीच्या बांधकामांसाठी एसटी महामंडळाला मुहुर्त काढावाच लागला. या नालीच्या बांधकाम करण्यात येणार असल्याचे एसटी आगार वाहतूक नियंत्रक बी एम पांचाळ व शिवाजी बांगर यांनी सांगितले आहे.
सदर नालीचे बांधकाम लवकरच चालू होणार असल्याने औंढानागनाथ येथील प्रवाशी नागरिक व बस प्रवाशांमधून आनंद व कुतुहल व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला बस स्थानकासमोरील नाली बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार असून यामुळे नाली कोण बांधणार हा प्रश्न मात्र या ठिकाणी गौण समजला जात आहे. लवकरात लवकर घाणपाणी वाहून नेणाऱ्या नालीचे बांधकाम करून सर्वांनाच सुखद धक्का द्यावा अशी अपेक्षा राज्य महामार्ग परिवहन मंडळाकडून व्यक्त होत आहे.