सरकार – प्रशासन ‘AC’ मध्ये कूल; बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल : विजय वडेट्टीवार

बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल
बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची दिशाभूल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : पावसाळा तोंडावर आला असताना शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या खरेदीसाठी गडबड उडाली आहे. असे असताना शेतकऱ्यांना आवश्यक त्‍या बियाणे मिळवण्यासाठी उन्हात तासणतास उभारावे लागत आहे. एवढे करूनही हवे ते बियाणांचा तुटवडा असल्‍याचे कारण देत अपुरे बियाणे दिले जात आहे. तेंव्हा शेतकरी पुरेशा बियाणांअभावी पेरणी कशी करणार हा प्रश्न उभा राहिला आहे. त्‍यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स वर पोस्‍ट करून सरकारवर टीका केली आहे.

अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला म्हणून कलम १४४ लागू करण्यात आली आहे. असे असतानाही प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेकडो शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात बियाण्यांसाठी तासन्‌तास रांगेत ताटकळत ठेवले आहे.

शेतकरी कपाशीच्या बियाण्यांसाठी धडपड करीत आहे. रांगेत लागून बियाणे मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण प्रश्न वर्षभराच्या जगण्याचा आहे.

बाजारात शेतकऱ्यांना हव्या असलेल्या नेमक्या बियाण्यांचा तुटवडा आहे. तुटवडा असल्याचे कारण पुढे करून प्रत्येक शेतकऱ्याला केवळ दोन पाकिट देण्यात येत आहे. दहा-वीस एकराचा शेतकरी या दोन पाकीट बियाण्यांमध्ये पेरणी कशी करणार? सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेही काढले. तक्रारी करण्यात आल्या. परंतु संवेदनशीलता हरविलेल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही.

शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होण्याची पुरती कल्पना असल्याने आता पोलिस संरक्षणात बियाणे विक्री केली जात आहे.
कंपनीने आता अधिकचा पुरवठा करू शकणार नाही, असे पत्रच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. म्हणून दुसऱ्या कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे.

आम्ही दोन-दोन पक्ष कसे फोडले, गळ्याचा पट्टा कसा काढला, दादा-भाई वर अन्याय कसा झाला यासारख्या विषयांवर दिवसभर प्रतिक्रिया देत सुटणारे महायुतीतील नेते या शेतकऱ्यांच्या ह्या अवस्थेवर अजूनही गप्प आहेत. सत्तेचे गुऱ्हाळ चालविण्यात व्यस्त आहेत.
अशी पोस्‍ट लिहून त्‍यांनी सरकारवर टिका केली आहे. सोबत त्‍यांनी कपाशीच्या बियाणांसाठी दुकानाच्या दारात कडक उन्हातही रांगा लावून उभ्या असलेल्‍या शेतकऱ्यांचे फोटो पोस्‍ट केले आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news