गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : नक्षल्यांना स्फोटके पुरवठा करीत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ६ महिन्यांपूर्वी कारवाई करुन ८ जणांना अटक केली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या आरोपीस पोलिसांनी तामिळनाडूतून नुकतीच अटक केली आहे. श्रीनिवास मुल्ला गावडे, रा. भंगारामपेठा (ता.अहेरी) असे आरोपीचे नाव आहे.
गडचिरोली पोलिसांनी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी अहेरी तालुक्यातील भांगारामपेठा गावातून स्फोटके बनविण्याचे साहित्य जप्त केले होते. त्यावेळी ४ आरोपींना अटक कण्यात आली होती. पुढे आणखी ४ जणांना अटक करण्यात आली. मात्र, मुख्य सूत्रधार असलेला श्रीनिवास गावडे हा फरार होता. गडचिरोली पोलिसांनी त्याला नुकतीच तामिळनाडूमधील सालेम येथून अटक केली. सोमवारी २२ ऑगस्टला त्याला गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?