अमरावती: पेठ रघुनाथपूर येथे आगीत ढाबा जळून खाक

अमरावती: पेठ रघुनाथपूर येथे आगीत ढाबा जळून खाक

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : गॅस सिलिंडरची अचानक गळती होऊन लागलेल्या आगीत ढाबा जळून खाक झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीरच्या पेठ रघुनाथपूर परिसरात ही घटना रविवारी दुपारी घडली.

एकीकडे उन्हाच्या झळा लागत असून तापमान वाढत आहे. मंगरूळ दस्तगीर पोलिसांच्या हद्दीतील पेठ रघुनाथपूर गावालगत असलेल्या गणेश इंगळे यांचे ढाब्याला अचानक आग लागली. ढाब्यावर दैनंदिन काम सुरू असताना किचनमध्ये अचानक आगडोंब उठला. आगीचे लोट वाढल्याने संपूर्ण ढाबाच आगेखाली आला. सदरची आग किचन मधील गॅस सिलिंडरच्या नळीतून गळती झाल्यामुळे आग लागली असल्याची माहिती मंगरूळ दस्तगिर पोलिसांनी दिली आहे.

पोलीस आणि नागरिकांनी हॉटेलमधील सिलिंडर आगीमधून बाहेर काढण्यात आले. तसेच विद्युत प्रवाह बंद करण्यात आला. चांदुर रेल्वे येथील अग्निशमन दल व बजरंग दलाचे कार्यकर्ते व गावकऱ्यांच्या मदतीने ही आग विझविण्यात यश आले. आगीत सुमारे ५ ते ७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यावेळी जीवित हानी झालेली नाही. दरम्यान, घटनास्थळी मंगरूळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news