विजय दामोदर शेंद्रे (४३, रा. वडगाव माहोरे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गौरव शिंदे याचे १० मे रोजी लग्न असल्यामुळे लग्नाची पत्रिका वाटण्याकरिता तेजस व त्याचा मित्रा आकाश दांडेकर हे (एमएच २७ बी.एच. ७२३६) या क्रमांकाच्या दुचाकीने चांदुर रेल्वे तालुक्यातील सोनगाव येथे गेले होते. तेथून ते अमरावतीला परत येत असताना, सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अमरावतीकडून चांदुर रेल्वेकडे जाणाऱ्या (एम.एच. २७ ए.एल. ७६५६) या क्रमांकाच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक करीत तेजसच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. त्यामुळे दोन्ही सर्व जण दुचाकीवरून खाली कोसळले. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना काही नागरिकांनी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. त्यावेळी तेजस शरद शेंद्रे व अर्जुन मोहन मोहोकार यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात आकाश दांडेकर व श्रीपाद माहोरे हे जखमी झाले असून, त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गर्दी केली होती. फ्रेजरपुरा पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. याप्रकरणात विजय शेंद्रे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी (एम.एच. २७ ए.एल. ७६५६) या क्रमांकाच्या दुचाकीस्वारा विरुध्द गुन्हा नोंदविला.