पंतप्रधान मोदींशी बरोबरी कुणीच करू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

अकोला, पुढारी वृत्तसेवा :  घरात बसून राजकारण करणा-यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्व, देशाला जगात बहुमान मिळवून देण्याचे त्यांचे कसब कधीच कळणार नाही. जगातील नेते त्यांचे नेतृत्व मान्य करीत आहेत. विरोधक एकत्र येऊन त्यांना आव्हान देण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. परंतु, ते कदापि यशस्वी होणार नाहीत. मोदी, शहा यांचे कर्तृत्व कळायला हवी असलेली पात्रता टीका करणा-यांमध्ये नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मोदी सरकारला ९ वर्ष झाल्याबद्दल अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानात आयोजित विराट सभेत ते बोलत होते.

जगातील सर्वात मोठी पार्टी व सभासद असलेल्या पार्टीचे नेते व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मानाचे स्थान प्राप्त करून देणारे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षे झाली आहेत. सेवा, सुशासन व गरिब लोककल्याण महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत राजराजेश्वर नगरीत आज दि. १८ जूनरोजी भाजपाच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर विधानपरिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, विधानपरिषद सदस्य आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ.प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, माजी महापौर विजय अग्रवाल, माजी मंत्री डाॅ. संजय कुटे, रश्मीताई जाधव, आशिष देशमुख, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस म्हणाले, काश्मीरातून 370 कलम हटवले, अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण कार्य सुरू आहे, कोविड काळात देश बांधव तसेच विदेशातही व्हॅक्सीन पाठवल्या अन्यथा गंभीर स्थिती ओढवली असती असे सांगून फडणवीस म्हणाले, हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेले. त्यामुळे आम्हाला शिंदे यांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले. भाजपची शक्ती दिवसेंदिवस वाढत आहे. प्रास्ताविक आमदार रणधीर सावरकर यांनी केले.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news