Christmas special : शेफ विष्णू मनोहर यांनी केली ५ हजार किलोची भाजी

Christmas special : शेफ विष्णू मनोहर यांनी केली ५ हजार किलोची भाजी
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : विविध खुसखुशीत पदार्थांसोबतच नवनवीन रेकॉर्ड करण्यासाठी प्रसिद्ध असलेले सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी ख्रिसमसच्या निमित्ताने आणखी एक नवा विक्रम केला आहे. स्थानिक बी. आर. ए. मुंडले हायस्कूलच्या सुमारे 1200 मुलांसोबत मनोहर यांनी 5 हजार किलोंची भाजी तयार केली. नंतर ही भाजी खवय्यांना वितरण करण्यात आली.

भाजी निवडणे, चिरणे आणि स्वच्छ करणे ही कामे मुलांनी केली तर भल्या मोठ्या कढईत या भाजीला फोडणी देण्याचे काम विष्णू मनोहर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. हा भाजीचा मनोहर यांचा 15 वा विश्व विक्रम आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या भाजीसाठी लागलेले साहित्य  

कांदे 330 किलो, लसुण, आलं व बटाटे प्रत्येकी 66.1 किलो, गाजर 330 किलो, फुलकोबी 661 किलो, पनीर 330.5 किलो, टोमॅटो 661 किलो, मटार 330.5 किलो, सांभार 132.2 किलो, तिखट 52.88 किलो, हळद 33.05 किलो, धने पावडर 39.66 किलो, मीठ 33.05 किलो, साखर 13.22 किलाे, तेल 396.6 किलो असे एकूण 4137.86 जिन्नस लागले. तयार झालेल्या भाजीचे वजन 4997.16 किलो होते.

दोन हजार किलो महाचिवडा 

यापूर्वी विष्णू मनोहर यांनी जागतिक खाद्यान्न दिनी दोन हजार किलो महाचिवडा तयार केला होता. रामदासपेठ येथील विष्णूजी की रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत तयार करण्यात आलेल्या चिवड्याचे कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मोफत वितरण करण्यात आले.

2500 किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद 

गणेशोत्सवात विष्णू मनोहर यांनी नागपुरातच 2500 किलो सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे वितरण केले. सलग 53 तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत. 5 फूट लांब आणि 5 फूट रुंद असा "सर्वात लांब पराठा' तयार करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. तीन तासात 7000 किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी 20 डिसेंबर 2018 रोजी भारतात 3200 किलो वांग्याचे भरीत (बैंगण भरता/वांगी) तयार करून अफलातून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे हे विशेष.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news