Youth Dies in  Accident Gondpipri Road
गोंडपिपरी मार्गावर अपघातात तरुण ठार झाला.(Pudhari Photo)

Chandrapur Accident | अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या तरुणावर काळाचा घाला; गोंडपिपरी मार्गावर अपघातात मृत्यू

गोंडपिपरी खराळपेठ मार्गावरील अपघातातील तिघांना रुग्णालयात दाखल करू घरी जाताना अपघात
Published on

Youth Dies in Accident Gondpipri Road

चंद्रपूर : काळ कधी कोणाचा घात करेल, याचा काही नेम नाही. गोंडपिपरी खराळपेठ मार्गावर गावातील तीन नागरिकांचा अपघात झाला. ते गंभीर जखमी झाले. अपघात झाल्याचे लक्षात येताच गावातीलच विनोद आतकोटवार थांबले. गोंडपिपरी येथील रूग्णालयात भरती केले. त्यानंतर आप्तेष्टांच्या मदतीने रूग्णांना चंद्रपूरला हलविले आणि त्यांना रूग्णालयात भरती करण्यास मदत केली. गावातील सहकाऱ्यांसाठी धावून गेल्याचा आनंद मनात असताना विनोदसाठी ती रात्र अखेरची ठरली. गावाकडून गोंडपिपरीला येत असताना झालेल्या अपघातात त्याचाही मृत्यू झाला. सकाळी अपघातात एकास गमविलेल्या गावकऱ्यांना दुस-याच्या निधनाची बातमी समजली अनं सारा गाव शोकाकूल झाला.

खराळपेठ येथील शैलेश फुलझेले, गुरूदास चटारे, दामु गुडपले हे सकाळी गोंडपिपरीकडे यायला निघाले होते. दरम्यान गोंडपिपरी खराळपेठ मार्गावरील क्रीडा संकुलजवळ दोन्ही बाईकची समोरासमोर धडक झाली. यात हे तिघेही गंभीर जखमी झाले. गावावरून येणा-या विनोद आतकोटवार हे याच मार्गाने जात होते. अपघाताची माहिती मिळताच ते धावून गेले. पोलीस व सहकार्याच्या मदतीने त्यांना गोंडपिपरीच्या रूग्णालयात दाखल केले.पण त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना चंद्रपूरला नातेवाईकांच्या मदतीने हलविण्यासाठी मौलाची भूमिका बजावली.

संपूर्ण दिवस याच कामात असलेला विनोद आपल्या गावाकडे पोहचला. दरम्यान जखमीपैकी शैलेश फुलझेले यांचे निधन झाल्याची बातमी आली. अनं गावात दु:खाचे वातावरण पसरले. दरम्यान आपले सारे कामकाज आटोपून विनोद पुन्हा गोंडपिपरीकडे यायला निघाला.याच मार्गावर उभ्या असलेल्या ट्रक्टरला त्याने धडक दिली. आणि अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सकाळपासून गावातील अपघातग्रस्तांना मदतीचा हात देणा-यांचाही सायंकाळी अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने सारा गाव सुन्न झाला. विनोद आतकोटावार हे खराळपेठ येथील रहिवाशी होते.बांधकाम मिस्त्री असणारे विनोद अनेकांच्या मदतीला धाऊन जायचे. पण नियतीने त्यांचाच असा डाव साधला. त्यांना दोन मुले आहेत. घरची परिस्थितीही नाजूक आहे.

अपघातांनी खराळपेठ हादरले

दि. 18 रोजी सकाळी झालेल्या अपघातात शैलेश फुलझेले यांचे निधन झाले. तर सांयकाळी विनोद आतकोटवार यांचाही अपघाती मृत्यू झाला. चार दिवसाअगोदर गोंडपिपरी खराळपेठ मार्गावरून पायदळ जाणाऱ्या गावातीलच एका तरूणाचा अज्ञात वाहन चालकाने बळी घेतला.या अपघाताच्या मालिकांनी खराळपेठवासी पुरते हादरले आहेत.आज अतिशय शोकाकूल वातावरणात विनोद आतकोटवार व शैलेश फुलझेले यांच्या पार्थिवावर वढोली येथील अंधारी नदीपात्रात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Youth Dies in  Accident Gondpipri Road
Tiger Terror in Chandrapur| चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत कायम, रविवारी घेतला दोघांचा जीव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news