Chandrapur Accident News | इथेनॉल कंपनीत मशिनमध्ये सापडून मजुराचा मृत्यू; शर्ट अडकल्याने दुर्घटना

मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील कंपनीत दुर्दैवी घटना
Worker Dies in Machine Accident
रसिक रमेश गेडाम (Pudhari Photo)
Published on
Updated on

Worker Dies in Machine Ethanol Plant

चंद्रपूर: मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एका इथेनॉल कंपनीमध्ये मशिनमध्ये सापडून मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज (दि. 24) घडली. रसिक रमेश गेडाम (वय 20, रा. राजगड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मूल तालुक्यातील एमआयडीसी परिसरात वेगवेगळ्या कंपन्या आहेत. काही दिवसांपासुन कार्निवल इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये इथेनॉलचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. आज सकाळी मजुर कामांवर हजर झाले. काम करीत असताना बिहार येथील राजेंद्र यांच्याकडे मजुर म्हणुन काम करीत असलेल्या रसिक रमेश गेडाम हा मशीन बंद करण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला होता. काम करीत असताना रसिकचे शर्ट मशीन मध्ये सापडला. त्याने शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शर्ट निघाला नाही. तोच हात मशिनमध्ये गेल्याने गंभीर जखमी झाला.

ही घटना अन्य कामगारांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बाहेर काढले. त्यानंतर त्याला तत्काळ मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. उत्तरीय तपासणीनंतर रसिकचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला. राजगड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले.

Worker Dies in Machine Accident
Chandrpur Illegal alcohol | चंद्रपूर : दुर्गाडीत आमदारांनी पकडून दिली अवैद्य दारू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news