

Korapna Wardha River overflow
चंद्रपूर: कोरपना तालुक्यात संततधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा नदीला मोठा पूर आला आहे. या पुरामुळे चंद्रपूर–भोयेगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला आहे. परिणामी नागरिकांची ये-जा ठप्प झाली आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तर दुसरीकडे, गोसेखुर्द धरणातून सुरू केलेल्या विसर्गामुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या पलिकडे वाहत आहे. या ठिकाणी हजारो हेक्टर शेती अजूनही पाण्याखाली आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी नदीकाठच्या भागांत न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज गुरुवारी मध्यरात्री कोरपना तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीला पूर आला असून या ठिकाणी पूरस्थितीमुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यरात्री पासून पुलावर पाणी चढल्याने गडचांदुर भोयेगांव चंद्रपूर हा मार्ग बंद आला आहे. पूर असाच वाढत राहिला तर नदीकाठावरील अंतरगाव, सांगोळा, कारवाई, इरई गावाना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदर गावांना रात्री प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.