Drowning death | वर्धा नदीत बुडालेले वडील, मुलगी व भाचीचे मृतदेह अखेर सापडले

रात्र झाल्याने थांबलेली शोधमोहीम आज सकाळी पुन्हा सुरू; पोलिसांकडून पंचनामा करून मृतदेह ताब्यात
Drowning death | वर्धा नदीत बुडालेले वडील, मुलगी व भाचीचे मृतदेह अखेर सापडले
Published on
Updated on

चंद्रपूर : जिल्ह्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह अखेर आज (दि.२९) सकाळी शोधमोहीमेदरम्यान सापडले. काल अंधारामुळे थांबविण्यात आलेली शोधमोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली होती.

Drowning death | वर्धा नदीत बुडालेले वडील, मुलगी व भाचीचे मृतदेह अखेर सापडले
Chandrapur Drowning Incident : काळजाचा थरकाप! वर्धा नदीत बुडून वडील मुलीसह भाचीचा दुर्दैवी अंत; शोधमोहीम सुरूच

धानोरा गाव परिसरात काल घडलेल्या हृदयद्रावक घटनेत राजू कोडापे (वय 40), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (वय 12) आणि भाची प्रियांका मडावी (वय 14) हे वर्धा नदीत बुडाले होते. कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेलेल्या या तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

Drowning death | वर्धा नदीत बुडालेले वडील, मुलगी व भाचीचे मृतदेह अखेर सापडले
Chandrapur Drowning Incident | वडिलांना वाचविण्याचा प्रयत्न निष्फळ: मुलगी, भाचीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू

घटनेनंतर घुग्घुस पोलिसांसह स्थानिक बचाव पथकाने काल संध्याकाळपर्यंत शोधमोहीम राबवली होती. मात्र अंधार वाढल्यामुळे आणि नदीतील परिस्थिती धोकादायक झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते.आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने नदीत सखोल शोध घेतल्यानंतर तिघांचेही मृतदेह सापडले.

Drowning death | वर्धा नदीत बुडालेले वडील, मुलगी व भाचीचे मृतदेह अखेर सापडले
Drowning death | सिपना नदीत दोन सख्या बहिणींचा बुडून मृत्यू 

घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली असून परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठी जाताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news