Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्ष लागवड’ मोहिमेचा शुभारंभ

40 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
Tree Plantation Drive Chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्षलागवड’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.Pudhari
Published on: 
Updated on: 

Tree Plantation Drive Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींमध्ये एकाच दिवशी ‘स्वस्तिक पद्धतीने वृक्षलागवड’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

भद्रावती तालुक्यातील सागरा व कोंडेगाव ग्रामपंचायतींमध्ये उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक गिरीश धायगुडे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याच वेळी जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांनी संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून स्वहस्ते वृक्षारोपण केले.

Tree Plantation Drive Chandrapur
Chandrapur Crime : ट्रकचे टायर चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातील दोघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

16 प्रकारच्या औषधी वृक्षांसह गावागावांत ‘ऑक्सिजन गार्डन’ 

या मोहिमेत स्वस्तिक आकाराच्या विशिष्ट रचनेत 16 प्रकारच्या औषधी गुणधर्म असलेल्या वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर नैसर्गिक ‘ऑक्सिजन गार्डन’ विकसित करण्याचा मानस आहे. तसेच स्वस्तिक रचनेतील मध्यवर्ती व मोकळ्या जागेमध्ये भविष्यात लॉन, खुली व्यायामशाळा, योग केंद्र तसेच जॉगिंग व वॉकिंग ट्रॅक यांसारख्या सुविधा विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

दुष्काळात रोजगारनिर्मितीला प्राधान्य 

जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेता ग्रामीण भागातील मजूर व गरजू कुटुंबांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. वृक्षलागवडीबरोबरच रोपांचे संगोपन, संरक्षण आणि संवर्धनाच्या कामांमुळे ग्रामीण रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

Tree Plantation Drive Chandrapur
Chandrapur Crime | एक लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघे पोलिसांच्या रडारवर

याप्रसंगी भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, एम. एस. नाथन, जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, पंचायत समितीचे अधिकारी, संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामरोजगार सेवक, ग्रामपंचायत अधिकारी, तांत्रिक कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाच्या नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत व्ही.बी.जी.रामजी. विभागाच्या आयुक्त अनिता मेश्राम आणि सहआयुक्त डॉ. विवेक घोडके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून परिचित असलेले वृक्ष क्रांती मिशन फाउंडेशनचे संस्थापक एम. एस. नाथन यांनी या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news