Tadoba Andhari Tiger Reserve | ताडोबाचा राजा अजूनही जखमीच: छोटा मटका नवेगाव परिसरात, उपचार सुरू

Chandrapur News | व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Chhota Matka Tiger
नवेगाव परिसरात छोटा मटका वाघाचा वावर आढळून आला.(Pudhari Photo)
Published on
Updated on

Chhota Matka Tiger Injury Tadoba Andhari

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वात प्रभावशाली आणि चर्चेत असलेला नर वाघ 'छोटा मटका' सध्या गंभीर जखमी अवस्थेत आहे. बुध्द पौर्णिमेच्या रात्री ब्रम्हा या वाघासोबत झालेल्या तुंबळ हाणामारीत त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. आता महिनाभर उलटून गेला असला तरीही छोटा मटका पूर्वीसारखा तंदुरुस्त झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘छोटा मटका’ या वाघाला आज कोण ओळखत नाही? त्याची शौर्यगाथा, आक्रमक स्वभाव आणि क्षेत्ररक्षणातील प्रावीण्य यामुळे तो ‘ताडोबाचा राजा’ म्हणून ओळखला जातो. निमढेला परिसरातील त्याचे वर्चस्व अद्यापही पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. त्याच्या निळ्या डोळ्यांच्या नयनतारा वाघिणीवरील प्रेमामुळे, त्याच्या अधिवासात कोणताही वाघ घुसू देत नाही.

Chhota Matka Tiger
Tadoba Tiger Reserve | ताडोबा प्रकल्पाच्या चंद्रपूर- मोहुर्ली मार्गावर वाघांसमारे उपद्रवींचा धिंगाणा, शनिवारी रविवारी सर्रास प्रकार सुरु

छोटा मटकाच्या क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग व मोघली यांना त्याने पूर्वीच ठार केले होते. यानंतर ब्रम्हा या वाघाने त्याच्या क्षेत्रात पाऊल ठेवताच जोरदार संघर्ष झाला. बुध्द पौर्णिमेच्या रात्री दोघांमध्ये हाणामारी झाली आणि छोटा मटकाने ब्रम्हाला यमसदनी पाठवले. मात्र, या लढाईत छोटा मटका स्वतःही गंभीर जखमी झाला. त्याच्या डाव्या पायाला झालेली दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला चालता येईनासे झाले.

जखमी अवस्थेत छोटा मटका रामदेगी परिसरात वास्तव्यास असून वन विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सतत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. नैसर्गिक उपचारांवर भर देत वन विभागाने त्याला वनातच राहून बरे होऊ देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

आज या घटनेला एक महिना उलटला असला तरीही छोटा मटका पूर्णपणे बरा झालेला नाही. चार-पाच दिवसांपूर्वी नवेगाव परिसरात त्याचे दर्शन पर्यटकांना झाले. आणि त्या वेळी टिपलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओत त्याचा डावा पाय अजूनही लंगडलेला दिसत असून, त्याला पूर्ण ताकदीनिशी चालता येत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अवस्थेमुळे त्याला शिकार करणेही कठीण जात आहे. त्यामुळे वन विभाग अजूनही त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. त्याच्याकरता बाहेरून खाद्याण्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

Chhota Matka Tiger
Tadoba Andhari Tiger Reserve | ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये दाखल झालेल्या दोन हत्तींवर ताडोबा प्रशासनाची नजर

नैसर्गिक उपचार सुरू असतानाच छोटा मटकाच्या पायाच्या गंभीर दुखापतीमुळे एकदा वन विभागाच्या पथकाने त्याला बेशुद्ध करून थेट वैद्यकीय हस्तक्षेप उपचार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या प्रक्रियेनंतरही त्याच्या चालण्यात सुधारणा झालेली नाही. तो अद्याप लंगडतच चालत आहे.

सध्या छोटा मटका निमढेला परिसरातून सरकून नवेगाव परिसरात फिरताना दिसत आहे. पण तो पूर्वीच्या ताकदीने वावरण्यापासून अद्याप दूर आहे. त्याची प्रकृती हळूहळू सुधारते आहे, मात्र ‘ताडोबाचा राजा’ पुन्हा कधी संपूर्ण ताकदीनिशी जंगलात गर्जना करेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news