Chandrapur News | चंद्रपुरात ९ दिवसांत ८ जण वाघाच्या हल्ल्यात ठार : तेंदूपत्ता संकलन करताना अशी घ्या खबरदारी

Dr. Jitendra Ramgaonkar | मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सुचविले खबरदारीचे सात उपाय
Dr. Jitendra Ramgaonkar
मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर (Pudhari Photo)
Published on
Updated on

Tiger Attack Prevention on Tendu Leaves Collection

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 75 तेंदूपत्ता घटकांपैकी 70 घटकांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू आहे. परंतु मागील नऊ दिवसांमध्ये तेंदूपत्ता संकलनाकरीता गेलेल्या 8 जणांचे वाघांनी जीव घेतले आहे. त्यामुळे नागरिकांनी तेंदूपत्ता तोडायला जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रम्हपुरी, मध्य चांदा, चंद्रपूर व ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर वनविभागाचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण 75 तेंदूपत्ता घटकांपैकी 70 घटकांमध्ये संकलनाचे काम सुरू आहे. या कामातून दरवर्षी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो. परंतु रोजगाराला म्हणजे जंगलात तेंदूपत्ता संकलनाला जाताना नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक असल्याचे वनविभागाने म्हटले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपत्ता संकलना दरम्यान खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. वनविभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहिमा, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत असल्यातरी तेंदूपत्ता संकलन करताना चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावर यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Dr. Jitendra Ramgaonkar
Tiger Terror in Chandrapur| चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची दहशत कायम, रविवारी घेतला दोघांचा जीव

2025 चा तेंदूपत्ता हंगाम सुरू आहे. एकट्या मे महिन्यात नऊ दिवसांत वाघांनी 8 जणांचा जीव घेतला आहे. त्यापैकी 7 जण हे तेंदूपत्ता संकलनाकरीता जंगलात केले होते. या मध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या महिलांमध्ये एकाच कुटूंबांती सासू व सुनेचाही समावेश आहे. अन्य एक व्यक्ती हा बकरी करीता चारा आणण्यासाठी जंगलात गेला होता. ह्या 8 व्यक्तींच्या दुर्दैवी मृत्यूने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. नागरिकांचे जीव जावू नये याकरीता मुख्य वनसंरक्षक रामगावकर यांनी नागरिकांना खबरदारीचे उपाय सुचवून आवाहन केले आहे.

तेंदूपत्ता संकलन करताना कोणती खबरदारी घ्यावी

1. वाघाच्या अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा.

2. तेंदूपत्ता संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी.

3. सकाळी 8 वाजता पूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी 5 वाजेपूर्वीच जंगलातून बाहेर यावे.

4. एकट्याने जंगलात जाऊ नये. समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे,

5. प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन नागरिकांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे.

6. तेंदूपत्ता संकलनासाठी पुरविण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात घालावा,

7. वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे आणि वनविभागाला माहिती द्यावी.

तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या नागरिकांनी वनविभागाने सुचविलेले खबरदारीच्या उपायाचा काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन रामगावकर यांनी केले आहे.

Dr. Jitendra Ramgaonkar
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यात १५ वर्षीय पट्टेदार वाघ जेरबंद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news