

रक्षाबंधनाच्या रात्री सोमवारी (दि.१९) भारतातून सुपरमून आणि ब्लू मून दिसणार आहे. तसेच पुन्हा अशा प्रकारची पोर्णिमा मार्च २०३७ मध्ये दिसणार आहे. सुपरमून म्हणजे चंद्राचे पृथ्वीजवळ येणे आणि चंद्राचा आकार मोठा दिसणे. तर ब्लू मून म्हणजे एकाच महिन्यातील दुसरी किंवा एका मौसमातील चार पौर्णिमेपैकी तिसरी पोर्णिमा होय. ह्यामुळे रक्षाबंधनाच्या पौर्णिमेला चंद्र मोठा आणि प्रकाशमान दिसेल, विशेष म्हणजे कधी कधी दोन रात्री पूर्ण दिसणारा चंद्र ह्या वेळेस १८,१९,२० ऑगस्ट च्या तीन रात्री कमी-जास्त फरकाने पूर्णचंद्र दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाच ग्रुप चे अध्यक्ष सुरेश चोपणे ह्यांनी दिली.
अमेरिकन आदिवासी ऑगस्टच्या पौर्णिमेला स्टर्जन मून असे सुद्धा संबोधले जाते. तर भारत्तात श्रावण पौणिमा आणि राखी पौर्णिमा असे म्हणतात. ज्या पौणिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असेल त्या पौर्णिमेला सुपरमून म्हणतात. चंद्राचा पृथ्वी सभोवतीचा भ्रमण मार्ग अंडाकृती असल्यामुळे चंद्र दूर आणि जवळ येत असतो. सर्वाधिक जवळ येण्याला पेरीघी तर दूर जाण्याच्या बिंदुला अपोघी असे म्हणतात. परंतु, वर्षातून दोन ते तीन पोर्णिमा ह्या चंद्र जवळ येत असताना होते.
एका मौसमातील एकूण ४ पौर्णिमेपैकी तिसरी पौर्णिमा ही ब्लू मून असते. त्याला सिझनल ब्लू मून म्हणतात. १९ ऑगस्ट चा ब्लू मून हा सिझनल ब्लू मून आहे. त्याच प्रमाणे ब्लू मून ची दुसरी व्याख्या म्हणजे एकाच महिन्यातील दुसरी पौर्णिमा होय. ह्याला मंथली ब्लू मून म्हणतात. ह्या महिन्यात एकच पोर्णिमा असली तरी ती मौसमातील तिसरी पौर्णिमा आहे, म्हणून तिला ब्लू मून असे म्हणतात. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे क्वचित चंद्र हा निळा दिसू शकतो.