खगोलीय घटना! सुपरमून आणि चंद्रग्रहण दोन्हींचा अनुभव एकाच दिवशी
चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करताना अंडाकृती मार्गाने फिरत असतो, त्यामुळे तो कधी जवळ तर कधी दूर जातो. जेंव्हा जवळ येतो तेव्हा तो मोठा आणि प्रकाशमान दिसतो यालाच 'सुपरमून' असे म्हणतात. उद्या मंगळवारी (दि. १४ जून) रोजी सुपरमून होणार असून हे २०२२ वर्षातील पहिला सुपरमून आहे. या पौर्णिमाला पाश्चात्त्य देशात 'स्ट्रॉबेरी मुन' असे म्हणतात.
जेव्हा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा तो एका सपाट वर्तुळाच्या (अंडाकृती किंवा लंबवर्तुळाच्या) मार्गाचा अवलंब करतो आणि पृथ्वीपासून चे कमीत-कमी अंतर 357,000 किमी (222,000 मैल) आणि जास्तीत -जास्त 406,000 किमी (252,000 मैल) (येथे पृथ्वी आणि चंद्र) दरम्यान बदलते. ) अंतर असते.
उद्या मंगळवारी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर 3,57,658 किमी राहणार आहे. त्यामुळे रात्रींचा चंद्र 7% मोठा आणि प्रकाशमान दिसेल. या पौणिमेचा 99.88% भूभाग प्रकाशमान असेल. नागरिकानी हा 'सुपरमून' अवश्य पाहावा असे आवाहन स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष आनी खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केले आहे.
हेही वाचलंत का?