Tadoba Andhari Tiger Reserve | ताडोबा अंधारीत वाघच नव्हे, तर जैवविविधतेचा अनमोल खजिना; बुद्ध पौर्णिमेच्या रात्री दुर्मिळ वन्यजीवांचे दर्शन

Chandrapur Forest News | १२८ अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमीं व वनाधिकाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी
Tadoba National Park
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (File Photo)
Published on
Updated on

Tadoba Andhari Tiger Reserve 128 Rare Animals Spotted

चंद्रपूर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री झालेल्या वन्यप्राणी गणनेत बफर व कोअर झोनमध्ये 88 तर बफर झोनमध्ये 40 असे एकूण 128 अत्यंत दुर्मिळ वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमीं व वनाधिकाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरली. या रात्री काही अत्यंत दुर्मिळ आणि संध्याकाळी किंवा रात्री सक्रिय राहणारे वन्यप्राणी नजरेस पडले. ज्यामध्ये सायाळ, चिंकारा, उडणारी खार, जवादी मांजर, उद मांजर, भुईरीच चांदी, आणि तरसाचा समावेश आहे.

चिंकारा :

ताडोबातील पाणवट्यावर आढळून आलेला चिंकारा अतिशय देखना आहे.
ताडोबातील पाणवट्यावर आढळून आलेला चिंकारा अतिशय देखना आहे.

चंद्राच्या लख्ख प्रकाशात ताडोबातील पाणवट्यावर आढळून आलेला चिंकारा अतिशय देखना आहे. तो मुख्यत्वे राजस्थान व मध्य भारतात कोरडे गवताळ प्रदेश, अर्ध-कोरडे जंगल आणि माळराने येथे दिसतो. सांदीपण रंगाचा (संध्या तपकिरी) शरीर, पांढऱ्या पोटासह, डोळ्यांपासून नाकापर्यंत जाणारी गडद पट्टी, मोठे गडद डोळे, आणि सरळ, टोकदार शिंगे (नरांमध्ये) असतात. लाजाळू आणि एकाकी राहणारा आहे. मानवांच्या सहवासापासून दूर राहतो. धोक्याची जाणीव झाल्यास, पुढचा पाय जमिनीवर आपटून नाकातून शिंका सारखा आवाज करतो. त्यामुळे त्याला "चिंकारा" हे नाव पडले आहे. तो पाण्याशिवाय महिनाभरार्यंत जगू शकतो. यावेळी बफरझोन मधील पळसगाव वनपरिक्षेत्रामध्ये 13 आढळून आले.

सायाळ (साळींदर) :

साळींदरच्या  शरीरावर लांब, टोकदार आणि पोकळ काटे असतात,
साळींदरच्या शरीरावर लांब, टोकदार आणि पोकळ काटे असतात,

शरीरावर लांब, टोकदार आणि पोकळ काटे असतात, जे ३० सें.मी. पर्यंत लांब काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचे काटे असतात. धोका जाणवल्यास सायाळ हे काटे उभे करतो आणि आक्रमण करणाऱ्यावर पाठ करून उभा राहतो. सायाळ डोंगर, खडकांच्या कपारीत आणि जमिनीखाली बिळे खोदून राहतो.तो शाकाहारी असून त्याचा आहार झाडांची साल, खोड, गवत, फळे आणि झुडूप यांचा समावेश करतो. यावेळी कोअर झोनमध्ये 23 तर बफर झोनमध्ये 4 सायाळची नोंद करण्यात आली आहे.

तरस :

तरस प्राणी  सानेरी, तपकीरी ते राखडी रंगाचा असतो.
तरस प्राणी सानेरी, तपकीरी ते राखडी रंगाचा असतो.

हा लहान ते मध्यम आकाराचा असतो. सानेरी, तपकीरी ते राखडी रंगाचा असतो. ऋतुनुसार बदलतो. तो सर्वभक्षी आहे. लहान प्राणी, पक्षी, अंडी, फळ मृत प्राणी खातो. याची विशेष अशी ओळख आहे. जंगलातील मृत प्राणी तो खातो. सडलेला मांस खातो त्यामुळे याला स्वच्छतादूत असे संबोधले जाते. वातावरण स्वच्छ करण्याचा काम तो करतो. तो एकटा किंवा जोडीने फिरतो.क्वचित समुहातही दिसतो. गवताळ प्रदेश, जंगल व मानवी वस्तीच्या सिमेवर दिसतो. यावेळी पहिल्यांदाच तरसाची बफर झोनमध्ये 1 ने नोंद करण्यात आली आहे. पर्यटकांना भविष्यात स्वच्छतेच्या दूताला पहायला मिळणार आहे.

उडणारी खार :

रात्री झाडांमधून फडफडत उडणारी ही खार ताडोबातील झाडझुडपांत दिसून आली.
रात्री झाडांमधून फडफडत उडणारी ही खार ताडोबातील झाडझुडपांत दिसून आली.

ही एक अत्यंत रोचक आणि अद्भुत वन्य प्रजाती आहे. ती झाडांमधून झाडांवर फडफड करत उडणाऱ्या चालनासाठी ओळखली जाते. रात्री झाडांमधून फडफडत उडणारी ही खार ताडोबातील झाडझुडपांत दिसून आली. सुमारे २५-४५ सेमी लांब (शरीर), आणि शेपूट सुमारे ३०-४० सेमी. गडद तपकिरी, तांबूस, किंवा फिकट राखाडी, आणि पोटाकडील भाग फिकट असतो. शरीराच्या बाजूला एक पतंगासारखी त्वचा असते, जी पुढच्या आणि मागच्या पायांदरम्यान ताणलेली असते. रात्री सक्रिय राहते. उंच झाडांवर राहते, कोअर झोनमध्ये यावेळी पहिल्यांदाच आढळून आली असून 5 नोंदी करण्यात आल्या आहेत.

उद मांजर :

काही भागांत उद मांजरला अपशकुनाचे लक्षण मानले जाते.
काही भागांत उद मांजरला अपशकुनाचे लक्षण मानले जाते.

हा एक लहान पण चपळ, निशाचर मांसाहारी वन्य प्राणी आहे. शरीराची लांबी अंदाजे ४०-६० सेमी; शेपटी सुमारे ३०-४० सेमी., करडा-तपकिरी रंग, शरीरावर गडद पट्ट्या व डाग, आणि शेपटीवर स्पष्ट काळे-पांढरे पट्टे असतात. नाक चोचेसारखे पुढे आलेले, डोळे टपोरे, आणि कान छोटे असतात. ती रात्री बाहेर पडतो, दिवसात बिळांत किंवा झाडाच्या बुंध्याजवळ लपतो. एकटा राहतो आणि आपल्या विशिष्ट क्षेत्रात फिरतो. काही भागांत उद मांजरला अपशकुनाचे लक्षण मानले जाते. अत्यंत दुर्मिळ उद मांजर कोअर 46 तर बफर मध्ये 4 असे एकूण 50 ची नोंद करण्यात आली.

जवादी मांजर :

साधारण मांजरीपेक्षा मोठी असते. फिकट तपकिरी ते करडसर रंगाची, काही वेळा अंगावर फिकट पट्टे किंवा डाग दिसतात. कान टोकदार, काही प्रमाणात काळसर असतात. बहुतेक वेळा एकटीच राहते आणि रात्री सक्रिय असते. गवताळ भाग, दलदली, नदीकाठची झुडपे, शेतांजवळील झाडे, आणि जंगलाच्या कडेला आढळते. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असलेलं हे प्राणी उंदीर व इतर कीटक नियंत्रणात ठेवतात. पाळीव मांजरीपेक्षा मोठी व जास्त घाबरवणारी वाटते. ही प्रजाती ही अत्यंत चपळ व संवेदनशील शिकारी आहे. कोअर झोनमध्ये 14 तर बफर झोनमध्ये 15 असे एकूण 29 ने नोंद करण्यात आली आहे.

Tadoba National Park
Tadoba Tiger Reserve | वाढत्या तापमानाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला फटका; व्यवस्थापनाकडून दुपारच्या सफारी वेळेत बदल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news