Tadoba Tiger Reserve | वाढत्या तापमानाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला फटका; व्यवस्थापनाकडून दुपारच्या सफारी वेळेत बदल
Chandrapur Heatwave effect Tadoba wildlife
चंद्रपूर: चंद्रपूर 45 अंश पार गेलेल्या तापमानामुळे देशात हॉट ठरले आहे. येथील जन जीवन प्रभावित होत आहे. दिवसागणिक तापमानात वाढ होत असल्याने सर्वांनाच त्याचा फटका बसत आहे. वाढत्या तापमानापासून जिल्ह्यातील ताडोबा अधारी व्याघ्र प्रकल्पालही सुटला नाही. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे पर्यटन सफारी प्रभावीत होऊ शकते त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापानाने सफारीच्या वेळेत बदल करून पर्यटकांना दिलासा दिला आहे.
देशातच नव्हे तर जगात चंद्रपर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे. त्यामुळे स्थानिक, देश विदेशातील पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते. येथे सफारीकरीता बाहेरील पर्यटक मुक्कामी सुध्दा येतात. परंतु सध्या चंद्रपूरला उन्हाचा चांगलाच तडाखा बसला आहे. त्यापासून वन्यप्राणीही सुटले नाहीत.
सध्या चंद्रपूर 45 अंशाच्या पार आहे. तर ब्रम्हपुरी 46 अंशाच्या घरात आहे. दरदिवशी तापमानात वाढ होत असल्याने जनजीवन प्रभावित होत आहे. वाढत्या उन्हाच धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने चंद्रपूरला नैसर्गिक आपत्ती जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ताडोबात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. परंतु यावेळचा कडक उन्हाळा ताडोबातील पर्यटकांकरीता कठीण जात आहे. त्यामुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ताडोबातील दुपारच्या सफारीच्या वेळात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
हा बदल 1 मे पासून करण्यात येणार होता, परंतु चंद्रपूरचे तापमान देशात हॉट ठरत आहे. शिवाय तापमान 45 अंशाच्या पार गेल्याने गुरूवारपासूनच (दि.२४) पर्यटन सफारीच्या वेळात बदल करण्यात आला आहे. सकाळची सफारी ही पूर्ववत वेळेतच सुरू आहे. परंतु दुपारी 2.30 ते 6.30 वाजता पर्यंत होणारी सफारी आता अर्धा तास उशिरा सुरू होणार आहे. म्हणजे 3.00 ते 7.00 वाजताची करण्यात आली आहे. ताडोबा व्यवस्थापनाने वेळेत बदल करण्याचा आदेश निर्गमित केला आहे.
ताडोबाच्या कोअर व बफर झोनमध्ये विविध नावाने प्रसिध्द असे अनेक वाघ, वाघिणी आहेत. आपल्या रूबाबदार शैलीने ते पर्यटकांना आर्कषित करतात. त्यामुळेच पर्यटक दरवर्षी ताडोबात पर्यटनांकरीता जावून वाघांचे दर्शन घेतात. ताडोबात वाघांची संख्या वाढल्याने आणि हमखास दर्शन होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पर्यटकांची चांगलीच गर्दी बघायला मिळते. हवामान खात्याने उष्ण लहरींचा इशारा दिल्याने येथील जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांचे वेळापत्रकात बदले करून 7 वे 11 वाजता केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला.

