

चंद्रपूर : पहलगाम हल्ल्यानंतर दोन देशातील तणाव लक्षात घेता भारत सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता पडू नये, यादृष्टीने देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथेही आयुध निर्माणी असून, त्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या कालपासून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या आधी मंजूर झाल्या, त्यांनाही कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून येथील आयुध निर्माणीला दारूगोळा उत्पादनाच्या वाढीचे निर्देश देण्यात आले आहे. त्यासाठी अधिकारी आणि कर्मचार्यांच्या भद्रावती येथील आयुध निर्माणी कारखाना हा चांदा आयुध निर्माणी म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो. हा कारखाना 1962 मध्ये सुरु झाला. आज या कारखान्यात जवळपास 2400 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. कारगील युद्धाच्या वेळेस येथील आयुध निर्माणीतील तोफेने महत्वाची भूमिका बजावली होती.
तसेच अलिकडे पिनाका नावाचे शत्रूवर जोरदार प्रहार करणारे अस्त्रही तयार करण्यात आले आहे. यासोबतच विविध प्रकारचा दारूगोळा तयार करण्यात येतो. पुढील सहा महिने पुरेल एवढा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट इथे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भद्रावती आयुध निर्माणी कामाला लागली आहे.