Chandrapur Paddy Theft | नागभीड तालुक्यात चिंधीचक शेतशिवारातून धानाच्या १२ पोत्यांची मध्यरात्री चोरी

चूर्णा झालेल्या ३४ पैकी १२ पोते ट्रॅक्टरने नेल्याचा संशय
Chindhichak Farm Theft
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाPudhari
Published on
Updated on

Paddy Bags Stolen Chandrapur

चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील चिंधिचक येथील विश्वनाथ सातपैसे यांच्या गावालगतच्या शेतातून चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री धानाची १२ पोते चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मळणी पूर्ण झाल्यानंतर शिवलेली ३४ पोते शेतात ठेवण्यात आली होती. त्यापैकी १२ पोते चोरट्यांनी संधी साधून लांबविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील शेतकरी विश्वनाथ सातपैसे यांनी बुधवारी (दि. ३० डिसेंबर)  धानाची मळणी पूर्ण केली होती. त्यांना एकूण ३४ पोते धान तयार झाले होते. सायंकाळपर्यंत ही सर्व पोते शिवण्यात आली आणि गावापासून अगदी कमी अंतरावर, शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. हे शेत गावाच्या हद्दीपासून काहीच अंतरावर असूनही, चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठी चोरी केली.

Chindhichak Farm Theft
Illegal Mining Chandrapur | जिवतीतून लेट्रॉईटचे अवैध उत्खनन; चंद्रपूर–घुग्घुस मार्गावरील शोरूम बांधकामांत बेकायदेशीर वापर

सायंकाळी शिवलेली ३४ पोते शेतात ठेवण्यात आली असताना, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यापैकी १२ पोते धानाची चोरी केली. या मध्ये सुमारे 30 ते 35 हजार रूपयाचे नुकसान आले आहे. चोरी झालेले धानाचे पोते ट्रॅक्टरद्वारे नेण्यात आले असावेत, असा संशय शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. कारण घटनास्थळी ट्रॅक्टरच्या चाकांच्या खुणा आढळून आल्या असून, पोते एकट्याने उचलून नेणे कठीण असल्याने वाहनाचा वापर झाल्याची शक्यता अधिक आहे.

घटनेची माहिती मिळताच विश्वनाथ सातपैसे यांनी तातडीने नागभीड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन पंचनामा व पंचनाटी (स्पॉट इन्स्पेक्शन) पूर्ण केला. परिसरातील संभाव्य मार्ग, सीसीटीव्ही असलेल्या भागाची तपासणी, तसेच ट्रॅक्टर व संशयित वाहनांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

Chindhichak Farm Theft
Air Pollution Chandrapur | चंद्रपुरात डिसेंबरमध्ये केवळ १ दिवसच हवा चांगली : ३१ पैकी २९ दिवस हवा प्रदूषित

नागभीड पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.  या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, मळणी हंगामात शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागभीड पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला असून, लवकरच चोरट्यांचा शोध लावण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनीही रात्री शेतमाल सुरक्षित ठेवण्याबाबत अधिक दक्ष राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news