Illegal Mining Chandrapur | जिवतीतून लेट्रॉईटचे अवैध उत्खनन; चंद्रपूर–घुग्घुस मार्गावरील शोरूम बांधकामांत बेकायदेशीर वापर

रात्रीच्या अंधारात खनिज वाहतूक, रॉयल्टीविना भरावासाठी उपयोग; महसूल व खाण विभागाचे दुर्लक्ष
 Chandrapur Ghugus Road Jivti Excavation
Chandrapur Ghugus Road Jivti ExcavationPudhari
Published on
Updated on

Chandrapur Ghugus Road Jivti Excavation

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातून लेट्रॉईट खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन व तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रॅक्टर, ट्रॉली व डंपरद्वारे हे खनिज चंद्रपूर–घुग्घुस मार्गावरील नव्या शोरूम व व्यावसायिक इमारतींच्या बांधकाम स्थळांवर पोहोचवले जात असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

जिवती तालुक्यातील जंगल तसेच महसूल क्षेत्रातून लेट्रॉईट खनिजाचे उत्खनन कोणतीही अधिकृत परवानगी, खाणपट्टा मंजुरी किंवा रॉयल्टी (रॉयल्टी) न भरता केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी रात्रीची वेळ निवडून हे खनिज वाहतूक केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 Chandrapur Ghugus Road Jivti Excavation
Chandrapur News : भाजप महानगराध्यक्षांच्या हकालपट्टीने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

चंद्रपूर–घुग्घुस मार्गावर सुरू असलेल्या नवीन शोरूम, व्यावसायिक संकुल आणि मोठ्या व्यावसायिक इमारतींच्या भरावासाठी (मुरूम/मातीच्या जागी) या खनिजाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अवैध उत्खनन व रॉयल्टीविना वापरामुळे शासनाच्या महसुलावर थेट परिणाम होत असून,  लाखो रुपयांचे नुकसानझाले आहे.

या उत्खननामुळे जमिनीची धूप, पर्यावरणीय ऱ्हास आणि नैसर्गिक संतुलन बिघडण्याचा धोका वाढला आहे. जंगल परिसरातील भूस्तरात बदल होत असल्याने भविष्यात पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी याबाबत महसूल विभाग, खाण विभाग तसेच पोलिस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी दिल्या आहेत. मात्र, अद्याप ठोस कारवाई न झाल्याने अवैध खनन करणाऱ्यांचे मनोबल वाढले असून, कायद्याची खुलेआम पायमल्ली सुरू असल्याचे चित्र आहे.

 Chandrapur Ghugus Road Jivti Excavation
ST Bus Accident Chandrapur | एसटी बसचा अपघात, सहा प्रवाशी जखमी; वाहक, महिला गंभीर

या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून अवैध उत्खनन, वाहतूक आणि वापर त्वरित थांबवावा, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news