

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या जुन्या वादातून दुपटटयाने गळा आवळून एका इसमाचा खून केल्याची घटना मूल तालुक्यातील डोनी येथे बैलपोळयाच्या दिवशी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी विजयपाल गोंविदराव अलाम (वय 25) याला पोलीसांनी अटक केली आहे. अमृत बाजीराव अलाम (वय 60) असे मृतकाचे नाव आहे.