

नागभीड तालुक्यातील आकापूर ते बाळापूर रेल्वे मार्गावरील रेल्वेरुळ क्रॉस करताना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुळ क्रॉस करत असताना 73 वर्षीय वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.14) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. विश्वनाथ दुधकुरे (वय.73) असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, बाळापूर ते आलेवाही दरम्यान आकापूर गावाजवळुन चंद्रपूर - गोंदिया रेल्वेमार्ग आहे. रेल्वेरूळ ओलांडताना आकापूर- डोरली रेल्वे बोगद्या असुन या बोगद्यात पाणी साचून असते. त्यामुळें बालापूर, आकापूर, आलेवाही, या रस्त्याने जाणारे अनेक वाटसरू बोगदा सोडून रेल्वे क्रासिंग करून ये-जा करत असतात. दरम्यान बुधवारी सोनापूर (तुकुम) येथील विश्वनाथ दुधकुरे हा इसम रेल्वेक्रासिंग करत होता. गोंदियाकडुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या रेल्वेने धडक लागल्याने त्याचा दिल्याने जागीच मूत्यू झाला. मृतकाचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय नागभीड इथे पाठविण्यात आले. बोगद्याचे बांधकाम सदोष असल्याने येथे पाणी साचतो व त्यामुळें या रस्त्याने जाणारे प्रवासी रेल्वेक्रासिंग करून प्रवास करित असल्यामुळे या बोगद्याची त्वरीत दुरुस्ती करावे असी मागणी नागरिकांनी केली आहे.