Chandrapur News : वने, व्याघ्र संवर्धनासाठी “चला माझ्या ताडोबाला” निसर्ग शिक्षणाला सुरूवात

Chandrapur News : वने, व्याघ्र संवर्धनासाठी “चला माझ्या ताडोबाला” निसर्ग शिक्षणाला सुरूवात

चंद्रपूर: पुढारी वृत्तसेवा : जैवविविधतेने संपन्न व्याघ्र भूमीचे संरक्षण व संवर्धन लोक सहभागाशिवाय शक्य नाही. येथील संरक्षित वन व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन लोकसहभागातून व्हावे. तसेच विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ करण्यासाठी "चला ताझ्या ताडोबाला" हा निसर्ग संवर्धनातून वन संवर्धन उपक्रमाला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुरूवात करण्यात आलेली आहे. Chandrapur News

सन २०१५-१६ पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत बफर क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी "चला माझ्या ताडोबाला" हा निसर्ग शिक्षण उपक्रम जन-जागृतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. निसर्ग शिक्षणाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी आवड निर्माण करणे आणि वने व वन्यजीव संवर्धनात त्यांचा सहभाग वाढविण्याच्या उदेश्याने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. Chandrapur News

सन २०१५-१६ पासून सुरू झालेल्या उपक्रमामध्ये आतापर्यंत सुमारे चार हजार पेक्षा अधिक बफर क्षेत्रातील तसेच प्रादेशिक वन क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी ताडोबा वनभ्रमंतीमध्ये सहभाग घेतला आहे. सन २०२२-२३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १३५ शाळेतील ५ हजार विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील २७ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता.

यावर्षी सन २०२३-२४ मध्ये वनमंत्री तथा पालकमंत्री यांच्या आदेशान्वये २९ नोव्हेबर २०२३ पासून या उपक्रमाची सुरूवात मुल वनपरिक्षेत्रातील भगवानपूर, फुलझरी, करवण, काटवन व डोणी येथील शाळेपासून करण्यात आली. भगवानपूर हे गाव सन २००७ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधून स्वयंइच्छेने पुनर्वसित झाले आहे. कोळसा व बोटेझरी या दोन गावाचे एकत्रित करून भगवानपूर नाव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी भगवानपूर गावाला प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे.

यावेळी प्रथम ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील व या व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या सर्व गावातील १२१ शाळेतील ५ हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना ताडोबा वनभ्रमंती सोबतच निसर्ग शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात येवून वने व व्याघ्र संवर्धनाची चळवळ अधिक प्रबळ करण्यात येणार असल्याची माहिती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news