

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : १५ हजाराची लाच घेताना महापालिकेतील लिपीकाला शुक्रवारी (दि.२३) रंगेहाथ अटक करण्यात आली. फारूख अहमद मुस्ताक अहमद शेख असे त्याचे नाव आहे. प्लॉट मालमत्तेवर भोगवटदार म्हणून नावे लावण्यासाठी त्याने १५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून शुक्रवारी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने दोन प्लॅट विकत घेतले आहेत. या प्लॅटवर भोगवटदार म्हणून आपल्यासह मुलांची नावे लावण्यासाठी त्याने महापालिकेत अर्ज दिला होता. त्यानंतर महापालिकेतील कर लिपीक फारूख शेख याने तक्रारदाराकडे १५ हजार लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर तक्रादाराकडून १५ हजाराची लाच घेताना फारूख शेख याला सापळा रचून लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे, पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, अरूण हटवार, नरेश नन्नावरे, राज नेवारे, संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे यांनी केली.
हेही वाचा :