Shivendraraje Bhosale Chandrapur Visit | चंद्रपुरात बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

बांबूपासून साकारलेली शिवप्रतिमा आणि लाकडापासून तयार केलेली तलवार भेट
Shivendraraje Bhosale Chandrapur visit
शिवेंद्रराजे भोसले यांना बांबूपासून साकारलेली शिवप्रतिमा आणि लाकडापासून तयार केलेली तलवार भेट देताना सुधीर मुनगंटीवार (Pudhari Photo)
Published on
Updated on

Shivendraraje Bhosale Chandrapur visit

चंद्रपूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे आज चंद्रपूर येथे आगमन झाले. या दौर्‍यादरम्यान त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ही भेट अत्यंत आत्मीयतेची आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडली.

याप्रसंगी मुनगंटीवार परिवारातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे आगळेवेगळे सादरीकरण करण्यात आले. बांबूपासून साकारलेली शिवप्रतिमा आणि लाकडापासून तयार केलेली तलवार भेट म्हणून सुपूर्त करून शिवेंद्रराजेंचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या विशेष भेटीदरम्यान इतिहासाची आठवण करून देणाऱ्या या कलाकृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.

Shivendraraje Bhosale Chandrapur visit
Chandrapur Rain News | सावधान! उद्या चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट

भेटीदरम्यान विविध राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा झाली. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आमदार देवराव भोंगळे, भाजप जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार अतुल देशकर, माजी महानगराध्यक्ष राहूल पावडे यांच्यासह भाजपा महानगर व ग्रामीण विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याच्या दिशा या भेटीतून अधोरेखित झाल्या. राजकारणातील सौहार्द, परस्पर आदर आणि सहकार्याचे उदाहरण म्हणून ही भेट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.

Shivendraraje Bhosale Chandrapur visit
Chandrapur District Bank | चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ७० वर्षांनंतर भाजपची एकहाती सत्ता; खासदार प्रतिभा धानोरकर यांचे स्वप्न अपूर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news