Chandrapur News : हृदयद्रावक..! रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचली नाही; मुलीला जन्म दिल्यानंतर मातेचा मृत्यू

जिवती तालुक्यातील दुर्गम घोडणकप्पी गावातील दुर्दैवी घटना

No Road No Ambulance Case
घोडणकप्पी या दुर्गम गावात रस्त्याअभावी गर्भवती संगीता गेडाम यांचा वेळेत वैद्यकीय मदत मिळू न मिळाल्‍याने मृत्यू झाला.Pudhari
Published on
Updated on

No Road No Ambulance Case

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील घोडणकप्पी या दुर्गम गावात रस्त्याअभावी एका गर्भवती महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संगीता गेडाम (वय २५) यांनी घरातच मुलीला जन्म दिला. यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रस्ता खराब असल्याने रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही

जिवती तालुक्यातील घोडणकप्पी हे गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. रविवारी पहाटे संगीता गेडाम यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र गावाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब असल्याने शासकीय रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. रुग्णवाहिकेला मुख्य रस्त्यावरच थांबावे लागले.


No Road No Ambulance Case
बजाज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मातेचा मृत्यू

घरातच प्रसूती

संगीता यांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेत त्यांना डोंगर उतरवून मुख्य रस्त्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसूती वेदना तीव्र झाल्याने त्यांना पुन्हा घरी आणण्यात आले. अखेर घरातच त्यांची प्रसूती झाली आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. कुटुंबीय मुलीच्या जन्मामुळे आनंदात असतानाच काही क्षणांत परिस्थिती बदलली. प्रसूतीनंतर संगीता यांना अतिरक्तस्राव सुरू झाला. त्यांची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले आणि प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले.


No Road No Ambulance Case
Beed crime | "जमीन माझ्या नावावर कर...", वडिलांनी नकार देताच मुलगा अन् सुनेचा संताप; वडिलांवर प्राणघातक हल्ला

खासगी मालवाहू वाहनातून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले

दरम्यान, प्रकृती अधिक गंभीर होत असल्याने त्यांना खासगी मालवाहू वाहनातून शंकरपठार येथे उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

गेडाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर

या घटनेमुळे नवजात मुलगी जन्मताच मातृछत्राला मुकली असून गेडाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे मुलीच्या जन्माचा आनंद तर दुसरीकडे आईच्या मृत्यूचे दुःख अशा दुहेरी भावनांमध्ये कुटुंबीय सापडले आहेत.घोडणकप्पीसारख्या दुर्गम गावांमध्ये अद्यापही बारमाही रस्ते, तातडीची आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिका सुविधा प्रभावीपणे उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती या घटनेतून पुन्हा समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी गावाला तातडीने सर्व हंगामात वापरता येईल असा रस्ता उपलब्ध करून देण्याची तसेच आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याची मागणी केली आहे.


No Road No Ambulance Case
crime news | कौर्याचा कडेलोट..! मुलाच्या हव्यासापोटी नराधम बापाने केली जुळ्या मुलींची निर्घृण हत्या

नवजात कन्या मातृछत्राला मुकली

घोडणकप्पी येथील संगीता गेडाम यांनी घरातच एका मुलीला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जन्माच्या काही क्षणांतच नवजात कन्या आईच्या मायेपासून कायमची वंचित झाली असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news