Chandrapur Railway Collision Bear | रेल्वेच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

चांदाफोर्ट - नागभीड मार्गावरील घटना, वनधिकाऱ्यांनी केला पंचनामा
One Died Due To railway Hit
प्रातिनिधीक छायाचित्रPudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : चांदाफोर्ट ते नागभिड मार्गावरील केळझर ते मुल मारोडा दरम्यान एका अस्वलाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी (25 मे) सकाळी घडली. वनविभागाने अस्वलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे.

सुत्रांनुसार, चांदाफोर्ट ते गोंदिया मार्गावरील दैनंदिन रेल्वे चालतात. या रेल्वे मार्गाचा बराचसा भाग हा जंगलातून जातो. या जंगलात विविध प्रकारचे वन्यप्राणी आहे. या जंगलातून वन्यप्राण्यांची भ्रमंती सुरू असते. रेल्वे मार्ग हा जंगलातून गेला असल्यामुळे रेल्वे मार्गादरम्यान बऱ्याच वन्यप्राण्यांचा मार्ग ओलांडताना मृत्यू होत असल्याच्या घटना वाढत आहेत. आज रविवारी सकळाी सातच्या सुमारास चांदाफोर्ट रेल्वे ही गोंदियाला जात असताना केळझर ते मुल मारोडा मार्गादरम्यान एका अस्वलाचा दरभंगा एक्सप्रेसच्या धडकेत मृत्यू झाला.

One Died Due To railway Hit
गोंदिया : अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू

सदर घटनेची माहिती वनविभागाला होताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन अस्वलाचा मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करुन अस्वलाच्या मृतदेहाचे सोपस्कार पार पाडले. या रेल्वे मार्गावर वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटनांत वाढ झाली आहे. यापूर्वीही बरेच वन्यप्राण्यांचे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेले आहेत. रेल्वेच्या धडकेत वन्यप्राण्यांचे मृत्यू होत असल्याने वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.

One Died Due To railway Hit
रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news