

Rajura Gadchandur ST Bus Accident
चंद्रपूर : राजुरा येथून गडचांदूर कडे जाणारी एसटी बस क्रमांक एमएच ३४ वाय ५३२१ च्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने बुधवारी (दि.३१) नाईकनगर गावाजवळ रस्त्याच्या कडेला गेल्याने अपघात झाला. या अपघातात वाहक प्रिया पोपटे ही गंभीर जखमी झाली असून तिला चंद्रपूर रूग्णालयात हलविण्यात आले आहे. बसमधील अन्य सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर राजुरा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबर ला दुपारी ही घटनी घडली. अपघातग्रस्त बस ही राजुरा आगाराची असून बसचे चालक उमेश कुक्षिकांत असल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाली नाही. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. या अपघातात वाहक
प्रिया पोपटे (वय ३२), किष्या इटकेलवार (वय १७), मंजुषा डोहे (वय ४१), शुभांगी मोहूर्ले (वय २९), माला राठोड (वय ५८), नारायण कनाके व सुंदराबाई इटकेवार हे सात प्रवाशी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य करत जखमींना तातडीने राजुरा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान वाहक प्रिया पोपटे गंभीर जखमी असल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.