Chandrapur Bribe | भद्रावतीत वनपाल, वनरक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात; २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ कारवाई

अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईची कागदपत्रे पुढे पाठविण्यासाठी मागितली होती लाच; खाजगी व्यक्तीमार्फत रक्कम स्वीकारताना तिघे ताब्यात
Bhadravati Forest Officer Bribe
Bhadravati Forest Officer Bribe Pudhari
Published on
Updated on

Bhadravati Forest Officer Bribe

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती वनक्षेत्र सहायक कार्यालयातील वनपाल आणि वनरक्षक यांनी अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चंद्रपूरच्या पथकाने सोमवारी (२७ जुलै) सापळा रचून खासगी व्यक्तीमार्फत लाच स्वीकारताना तिघांना ताब्यात घेतले. वनपाल कोमल नरसिंगराव घुगलोत (वय ४२), वनरक्षक संदीप पुंडलिक पारवे (वय ३९) आणि खासगी इसम ललीत दिलीप नागपूरे (रा. भद्रावती) असे आरोपींचे नावे आहेत.

Bhadravati Forest Officer Bribe
Chandrapur Crime News | वरोरा पोलिसांची कारवाई; सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता तक्रारदार स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून रेती वाहतूक करीत होते. त्यावेळी वनपाल व वनरक्षक यांनी ट्रॅक्टर अडवून तो वनक्षेत्र सहायक कार्यालय, भद्रावती येथे नेला. अवैधरित्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी २३ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करून २७ जुलै रोजी पंचासमक्ष सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपींनी तक्रारदाराकडून खासगी इसम ललीत दिलीप नागपूरे याच्या मार्फत २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Bhadravati Forest Officer Bribe
Chandrapur crime news | बंद शेडमध्ये आढळला मजुराचा मृतदेह; परिसरात खळबळ

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान आणि अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news