Chandrapur Rain : चंद्रपुरात पाच नद्यांनी ओलांडली धोका पातळी

वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट नद्यांना पूरसदृश्य परिस्थिती
Flood Situtation In Chandrapur
मुसळधार पावसामुळे चंद्रपुरातील नद्यांना पूर आला आहे.Pudhari Photo

चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे वर्धा, वैनगंगा, उमा, हिरे आणि झरपट नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने रविवारी (दि.21) रेड अलर्ट तर सोमवारी येलो अलर्ट दिला आहे. त्यामूळे पूरस्थिती पाहण्यासाठी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Flood Situtation In Chandrapur
Gadchiroli Rain | गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुरामुळे ८ मार्ग बंद
Summary
  • चंद्रपुरात आज रेड तर उद्या येलो अलर्ट

  • संततधार अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती

  • नागरिकांनी पूरस्थिती पाहण्यासाठी न जाण्याचे आवाहन

चंद्रपूर जिल्हयात मागील तीन दिवसापासून सर्वत्र सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हयातील महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याने जड वाहतुकीसाठी प्रवास बंद करण्यात आला आहे. वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट ह्या वाहणाऱ्या मुख्य नद्या आहेत. मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ह्या सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. शनिवारी (दि.21) पूर पाहण्यासाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत जिल्हाप्रशासनाने नागरिकांना पूर परिस्थिती पाहण्यासाठी जावून जीव धोक्यात टाकू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Flood Situtation In Chandrapur
Raigad Rain : रोह्यात मुसळधार पाऊस, कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली

रविवारी जिल्हयातील चंद्रपूर ते मुल मार्ग, पोंभुर्णा ते मुल मार्ग, गोंडपिपरी ते मुल मार्ग, चंद्रपूर ते गडचांदुर भोयेगांव मार्ग बंद झालेले आहेत. पुरस्थिती निर्माण झालेल्या पुलांवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना मदतीकरिता क्रमांक 112 तसेच चंद्रपूर आपत्ती व्यवस्थापन पूर नियंत्रण कक्ष 07172 - 272480, 251597 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news