चंद्रपूर : उष्माघाताने वृध्द बहिणींचा मृत्यू; उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

चंद्रपूर : उष्माघाताने वृध्द बहिणींचा मृत्यू; उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वाढलेला तापमान असह्य झाल्याने वृध्द सख्या बहिणींचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना आज (दि.30) सायंकाळी सहाच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर येथे घडली. सुंदरा रामचंद्र कोडापे (वय 69) आणि गोंडीन आत्माराम आत्राम (वय 59) असे मृत बहिणींचे नाव आहे. दोघीही बहिणींचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट घोषित आहे. तर चंद्रपुरात पारा 45 अंशाच्या वर पोहचला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील हिरापूर गावात मोठी बहीण सुंदरा रामचंद्र कोडापे व लहान बहीण गोंडीन नारायण आत्राम ह्या दोघीही बहिणी एकत्र राहत होत्या. दोन्ही बहिणींचा परिवार नसल्याने त्या एकत्र राहत होत्या. त्यांची आर्थिक परिस्थिती बेतीची असल्याने त्या पत्राचे छप्पर असलेले छोटेशा घरात राहतात. दोन्ही बहिणी एकमेकांच्या सहाय्याने जिवन जगत होत्या.

आज (दि.30) सायंकाळी सहा वाजतापर्यंत त्या घरात हालचाल करताना दिसल्या नाहीत. त्यामुळे शेजारील काही व्यक्तींनी घरात बघितले असता. दोघीही बहिणी एकमेकावर पडून होत्या. या घटनेची माहिती गावात पसरताच एकच गर्दी झाली. वृध्द बहिणींच्या मृत्यूचे कारण उष्माघाताचे सांगितले आत आहे. आज गुरूवारी चंद्रपूरात उष्णतेचा ऑरेंज अलर्ट आहे. तापमान 45 अंशाच्या वर पोहचलेला आहे.

मागील चार पाच दिवसांपासून नवतपा सुरू असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. नागरिकांना उष्णता असह्य होत आहे. ज्या दोघी बहिणींचा मृत्यू झाला त्यांचा घराचे छप्पर टिनाचे आहे. त्यांच्या घरी साधा पंखाही नाही. त्यामुळे वृद्ध असल्याने त्यांना उकाडा असह्य झाल्यामुळे आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती पोलीस किंवा आरोग्य विभागाला माहिती मिळालेली नव्हते. माध्यमांद्वारे त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news