Bamboo Ganesha Idol : चंद्रपुरात बांबूपासून साकारला बाप्पा; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

बीआरटीसीच्या विद्यार्थ्यांचा  ‘बांबू टू बाप्पा’ अभिनव उपक्रम, चिचपल्ली येथे ‘जागतिक बांबू सप्ताह 2026’चा शुभारंभ
ECO Friendly Bamboo Ganesha Idol
ECO Friendly Bamboo Ganesha IdolPudhari
Published on
Updated on

ECO Friendly Bamboo Ganesha Idol

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देत बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) चिचपल्ली येथील विद्यार्थ्यांनी चक्क बांबूपासून आकर्षक श्री गणेशमूर्ती साकारली आहे. ‘बांबूटूबाप्पा’ या अभिनव उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या या गणेशमूर्तीची विधिवत स्थापना करून केंद्रात ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’

महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात 14 ते 18 सप्टेंबर या कालावधीत ‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी ‘डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या तयार केलेली बांबूची गणेशमूर्ती विशेष आकर्षण ठरली.

ECO Friendly Bamboo Ganesha Idol
Chandrapur Illegal Sand | चंद्रपूर जिल्ह्यात अवैध गौण खनिजाची वाहतूक; १६ चाकी ट्रक, १२ ब्रास रेती जप्त

पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक बांबू तंत्रज्ञानाचा अनोखा संगम

बांबूपासून पर्यावरणपूरक आणि कलात्मक गणेशमूर्ती साकारून विद्यार्थ्यांनी परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक बांबू तंत्रज्ञानाचा अनोखा संगम घडवून आणला आहे. बांबूचा उपयोग केवळ पारंपरिक वस्तू तयार करण्यापुरता मर्यादित नसून आधुनिक डिझाईन, कलाकृती, शाश्वत उत्पादने आणि उद्योजकतेसाठीही प्रभावीपणे होऊ शकतो, असा संदेश या गणेशमूर्तीच्या माध्यमातून देण्यात आला.

‘बांबूचा बाप्पा’ ठरला लक्षवेधी

या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या संकल्पनेलाही नवे स्वरूप मिळाले आहे. निसर्गाशी सुसंगत असलेल्या बांबूचा कल्पकतेने वापर करून विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘बांबूचा बाप्पा’ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि कौशल्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाला बीआरटीसीचे संचालक उमेश वर्मा, वनक्षेत्रपाल सतीश शेंडे, चिचपल्लीचे सरपंच चंदन उचेकर, न्यू एरा क्लिनिक सोल्युशनचे सचिन धात्रक आणि बीआरटीसीचे अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बांबू हे ‘हरित सोने’ असून बांबूवर आधारित पर्यावरणपूरक उत्पादने, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून शाश्वत आर्थिक विकासाला मोठी चालना मिळू शकते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

ECO Friendly Bamboo Ganesha Idol
Chandrapur Crime : माजी नगरसेवक अजय सरकार यांच्यावर हद्दपारीची कारवाई; तीन महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार

जागतिक बांबू सप्ताह २०२६’ अंतर्गत जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन

‘जागतिक बांबू सप्ताह २०२६’ अंतर्गत तांत्रिक सत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थी उपक्रम, स्पर्धा आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचा समारोप १८ सप्टेंबर रोजी ‘जागतिक बांबू दिना’च्या विशेष कार्यक्रमाने होणार आहे. यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना 'बांबू फॉर द फ्युचर - फ्रॉम ट्रॅडिशन टू इनोवेश' अशी असून बांबू संशोधन, नवोपक्रम, शाश्वत उपजीविका आणि हरित अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे, हा त्यामागील प्रमुख उद्देश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news