चंद्रपूर : बारावी मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांने गळफास घेवून  जीवन संपवले

चंद्रपूर : बारावी मध्ये कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांने गळफास घेवून  जीवन संपवले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : आज (दि.21) राज्यात 12 वीचे निकाल जाहीर झाला. सर्वच विद्यार्थी निकाल पाहून यश प्राप्त केल्यानंतर  आनंद साजरा करीत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात नेरी येथे आज दुर्दैवी घटना घडली. एका विद्यार्थ्यांने बारावीत कमी गुण मिळाल्याने नैराश्यात येऊन त्याने घरीच  गळफास घेवून जीवनयात्रा संपविली आहे. आकाश पुरुषोत्तम वैरागडे (वय 18, रा. नेरी (चिमूर) असे विद्यार्थांटचे नाव आहे. यामुळे नेरी गावात शोककळा पसरली आहे.

चिमूर तालुक्यातील नेरी येथील आकाश पुरुषोत्तम वैरागडे हा विद्यार्थी चिमूर येथील नेहरू कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता.  बारावीची परीक्षा झाली आणि पेपरसुद्धा चांगले गेले असल्याने परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन करीन असा त्याचा आत्मविश्वास होता. आज मात्र निकाल पाहताच त्याला धक्का बसला. अभ्यास व मेहनत करूनही त्याला कमी गुण मिळाल्याने तो नैराश्यात गेला.  त्याने जीवनयात्रा संपविण्याचा निर्णय घेत घरात कुणीही नसतांना दरवाजा बंद करून  दोराने दुपारी 2 वाजताच्या सुमारास  गळफास घेऊन जीवन संपवले.  ही घटना सायंकाळी उघडकीस आली.

सदर घटनेची माहिती बाहेरून सायंकाळी 6 वाजता दरम्यान  घरी परत आलेल्या भावाला समजली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्याने आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने  दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी भावाला धक्का बसला. मृत्तदेह घराला लटकलेल्या अवस्थेत आधळून आला. शेतात कामाला गेलेले आई-वडील घरी पोहचले. त्यांनाही धक्का बसला. मृत्यूची वार्ता गावात पसरताच आकाशला बघण्यासाठी  घरासमोर गर्दी झाली.  सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच ते घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाच तपास पोलीस करत आहेत. परंतु, आकाशने आज घोषीत झालेल्या बारावीच्या कमी मिळाल्याने जीवन संपवल्याचे कारण समोर येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news