
Chandrapur Ghuggus Congress Agitation Opposition MP Deputy CM
चंद्रपूर : भारत माता की जय! देश की सेना का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान, तिरंगे का ये अपमान नही सहेगा हिंदुस्थान, अशा गर्जना देत शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज ( दि. 20 ) दुपारी काँग्रेस कार्यालया समोरील परिसरात भारतीय सेनेचे अपमान करणारे मध्यप्रदेशचे भाजप नेते व मंत्री विजय शाह व उपमुख्यमंत्री जगदीश देवाडे यांच्या प्रतिकात्मक चित्रांना जोडे मारून निषेध केला.
जम्मू काश्मीर पहलगाम घटनेनंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्तानातील दहशतवादी तळावर हल्ला करून उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराच्या या कारवाईची माहिती कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी देशाला दिली. मात्र, जाती - पातीचे धर्माचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे मध्यप्रदेश येथील मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत असताना मंत्र्यावर अद्याप कारवाई आलेली नाही. तसेच सैनिक देशाचे गर्व असतात. त्याच राज्याचे उपमुख्यमंत्री जगदीश देवाडे यांनी ही भारतीय लष्कराचा अपमान करीत सैनिकांनाही मोदींच्या चरणी नतमस्तक असल्याचे सांगितले. सैनिकांच्या शौर्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी तिरंगा यात्रा काढणारे भाजपचे राजस्थान येथील आमदार बालमुकुंद आचार्य यांनी तिरंग्याचा अपमान केला आहे.
यावेळी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, तालुका सचिव विशाल मादर,ज्येष्ठ नेते शेख शमिउद्दीन, ज्येष्ठ नेते अनिरुद्ध आवळे, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख, एस्सी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, महिला जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, संध्या मंडल, सरस्वती कोवे, जोया शेख, वैशाली पोपटकर, दुर्गम्मा आरापेल्ली, सगुणम्मा डोमा, बालकिशन कुळसंगे, सुनील पाटील, देव भंडारी, दीपक पेंदोर, कुमार रुद्रारप, शहंशाह शेख, नाणी मादर, रंजित राखुंडे, अंकुश सपाटे, आयुष आवळे, साहिल आवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.