Congress: काँग्रेसची मोठी कारवाई; दोन नेत्याचं निलंबन

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका
Congress action against two leaders
पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने दोन नेत्यांवर कारवाई केलीPudhari News Network

चंद्रपूर : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे डॉ. विजय देवतळे व डॉ.आसावरी देवतळे यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेश कार्यालयाने तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. या कारवाईने काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.

Congress action against two leaders
‘वंचित’मुळेच मविआच्या ६ उमेदवारांचा पराभव : काँग्रेस

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली. यादरम्यान चंद्रपूर आर्णी वणी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस कडून प्रतिभा धानोरकर तर भाजप कडून सुधीर मुनगंटीवार उभे होते. याच कार्यकाळात काँग्रेसचे प्रचारादरम्यान डॉ. विजय देवतळे व डॉ.आसावरी देवतळे यांनी पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला. या बाबत स्थानिक पातळीवरून प्रदेश कार्यालयाकडे देवतळे दांपत्याच्या विरोधातील पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

Congress action against two leaders
आज नाही तर उद्या सत्याचा विजय हाेताेच : राहूल गांधी

या तक्रारीच्या अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून प्रदेश काँग्रेस कार्यालयाच्या वतीने डॉ. विजय देवतळे व डॉ. आसावरी देवतले यांना ६ वर्षाकरिता निलंबित करण्यात आले. विजय देवतळे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. तर आसावरी देवतळे ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. निलंबनाचे कार्यवाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी याबाबत कार्यवाहीचे पत्र डॉ. विजय देवतळे व डॉ.आसावरी देवताडे यांना दिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news