बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम तीन महिन्यामध्ये पुर्ण करा अन्यथा आंदोलन छेडू : खासदार प्रतिभा धानोरकर

बाबुपेठ उड्डाण पुलाचे काम तीन महिन्यामध्ये पुर्ण करा अन्यथा आंदोलन छेडू : खासदार प्रतिभा धानोरकर

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधिकाऱ्यांसह उड्डाण पुलाला भेट दिली. प्रलंबित असलेल्या बाबू पेठ उड्डान पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश यावेळी अधिकाऱ्यांना दिले. उडान पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण केले नाही तर जनसामान्यांच्या समस्यांसाठी उग्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी प्रतिभा धानोरकर यांनी दिला.

खासदार धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठकांचे सत्र सुरु केले आहे. गुरुवारी (दि.20) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास निर्माणाधिन असलेल्या आणि 8 वर्षांपासून रखडलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत उड्डाण पुल जनतेच्या सेवेत सुरु न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा उपस्थित अधिकाऱ्यांना दिला.

सदर पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरु असून या पुलाच्या अभावी अनेक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलाची प्रतिक्षा बाबुपेठ वासियांना असून अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात खासदार धानोरकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यानंतर खासदार धानोरकर यांनी तातडीने पाहणी करुन उर्वरीत कामाचा आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. 2 चे कार्यकारी अभियंता टांगले, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष चंदा वैरागडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगर सेवक पितांबर कश्यप, सोहेल रजा, प्रशांत भारती यांचेसह बाबुपेठ नागरीकांची उपस्थिती होती.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news