Chandrapur News | वरोऱ्यातील क्रीडा मैदानाच्या वादाला तात्पुरता विराम; खेळाडूंच्या हिताचा प्रश्न कायम!

तीन मागण्या मान्य झाल्यानंतर आनंद गेडाम, निखिल मांडवकर यांचे आमरण उपोषण मागे; यंदाचा मेळावा मात्र मैदानावरच होणार
Sports Ground Controversy Warora
Sports Ground Controversy WaroraPudhari
Published on: 
Updated on: 

Sports Ground Controversy Warora

चंद्रपूर: वरोरा येथील तालुका क्रीडा संकुलाचे मैदान व्यावसायिक मेळाव्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावरून वरोऱ्यात निर्माण झालेल्या संघर्षाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. शिवसेना (उबाठा) नेते मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनानंतर आनंद गेडाम आणि निखिल मांडवकर यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेतले.

आंदोलनकर्त्यांच्या चार मागण्यांपैकी तीन मागण्या मान्य करण्यात आल्या असून, भविष्यात क्रीडा संकुलाच्या मैदानाचा वापर क्रीडाविषयक उपक्रमांसाठीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, १३ नोव्हेंबरपासून होणाऱ्या कल्पतरू सार्वजनिक संस्थेच्या मेळाव्याला दिलेली परवानगी कायम असल्याने खेळाडूंच्या सरावाचा आणि त्यांच्या संभाव्य नुकसानीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

Sports Ground Controversy Warora
Chandrapur Fire News : बालाजी वॉर्डात फटाक्यामुळे घराच्या दुसऱ्या माळ्याला भीषण आग!

कल्पतरू सार्वजनिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यासाठी प्रशासनाने तालुका क्रीडा संकुलाचे मैदान उपलब्ध करून देण्यास परवानगी दिली होती. या निर्णयामुळे मैदानावर नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना अडचणी निर्माण होण्याची तसेच क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या निर्णयाविरोधात मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध लोकप्रतिनिधींनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, मैदानाचा वापर केवळ क्रीडा उपक्रमांसाठीच करण्यात यावा आणि व्यावसायिक मेळावे अथवा अन्य कार्यक्रमांसाठी मैदान देण्यात येऊ नये, या मागणीसाठी आनंद गेडाम आणि निखिल मांडवकर यांनी आमरण उपोषण सुरू केले. आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर प्रशासन आणि तालुका क्रीडा संकुल समितीच्या स्तरावर चर्चा करण्यात आली.

Sports Ground Controversy Warora
Chandrapur News : क्रीडांगणावरील व्यापारी मेळाव्याला विरोध तीव्र; वरोऱ्यात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन!

या बैठकीत मैदानाचा वापर क्रीडाविषयक उपक्रमांव्यतिरिक्त अन्य कार्यक्रमांसाठी करू नये, तसेच मैदानाच्या वापरासंदर्भात शासनाचे नियम व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांच्या चार मागण्यांपैकी तीन मागण्या मान्य करण्यात आल्या असून, उर्वरित एका मागणीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

त्यानंतर उपोषणस्थळी नायब तहसीलदार गिरीश बोरुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहीफोडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष वाकडे यांच्या उपस्थितीत आनंद गेडाम व निखिल मांडवकर यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

या आंदोलनातून क्रीडा संकुलाच्या मैदानाच्या वापराबाबत भविष्यातील भूमिका स्पष्ट झाली असली, तरी यंदाच्या मेळाव्याचा प्रश्न कायम आहे. मेळाव्याच्या तयारीमुळे मैदानाचा वापर मर्यादित होणार असल्याने नियमित सराव करणाऱ्या खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः आगामी स्पर्धांच्या तयारीत असलेल्या खेळाडूंसाठी पर्यायी मैदानाची व्यवस्था करण्यात आली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

Sports Ground Controversy Warora
Chandrapur Crime News: वरोऱ्यात खळबळ! गाडगेबाबा नगरात कचऱ्याच्या ठिकाणी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; घातपाताचा संशय

एकीकडे भविष्यात मैदानाचा व्यावसायिक वापर होऊ नये, असा निर्णय घेण्यात आला; तर दुसरीकडे यंदाच्या मेळाव्याला दिलेली परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सरावावर होणारा परिणाम आणि त्यांच्या संभाव्य नुकसानीची जबाबदारी कोण घेणार, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.