Chandrapur Crime News:
चंद्रपूर : वरोरा शहरातील आनंदवन चौक परिसरातील गाडगेबाबा नगर येथे एका व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहराच्या मध्यवस्तीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडगेबाबा नगर परिसरातील काही लहान मुले नेहमीप्रमाणे मैदानावर क्रिकेट खेळत होती. खेळ सुरू असताना त्यांचा चेंडू जवळच असलेल्या कचरा टाकण्याच्या ठिकाणी गेला. चेंडू आणण्यासाठी काही मुले त्या दिशेने गेली असता त्यांना तेथे एक मृतदेह पडलेला दिसला. मृतदेहाची अवस्था पाहून मुले घाबरली. त्यांनी तातडीने परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आल्याने हा मृत्यू नैसर्गिक नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला, तो परिसर शहराच्या मध्यवस्तीत येतो. त्यामुळे या घटनेने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला? मृतदेह त्याच ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला की अन्य ठिकाणाहून आणून येथे टाकण्यात आला? तसेच या घटनेमागे कोणाचा हात आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेने सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला? मृतदेह त्याच ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला की अन्य ठिकाणाहून आणून येथे टाकण्यात आला? तसेच या घटनेमागे कोणाचा हात आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.