Chandrapur MD Drugs Seized | वरोऱ्यात MD ड्रग्सविरोधात पोलिसांची कारवाई; ६.५२० ग्रॅम मेफेड्रोनसह बोलेरो जप्त

मोहबाळा परिसरात संशयित वाहनाची झडती; ५.६५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात
 Drugs News |
Drugs News File Photo
Published on: 
Updated on: 

MD Drugs Warora

चंद्रपूर : मोबाईलवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी मोहबाळा परिसरात कारवाई करत ६.५२० ग्रॅम मेफेड्रोन (MD) जप्त केले. या कारवाईत दीपक खारकर (वय ४५, रा. टाकळी, ता. वरोरा) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून अमली पदार्थासह बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी मोहबाळा परिसरात एका वाहनातून अमली पदार्थाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री केल्यानंतर पोलिस पथक पंचांसह घटनास्थळी रवाना झाले.

 Drugs News |
Chandrapur News | जांभुळघाट आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गिरी निलंबित!

मोहबाळा ते जीएमआर कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पठाण यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ एमएच २७ बीएक्स ५७०३ क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता काळ्या प्लास्टिकमध्ये ठेवलेल्या पांढऱ्या प्लास्टिकच्या झिप पाऊचमध्ये पांढऱ्या-भुरकट रंगाची पावडर आढळून आली.

तपासणी केल्यानंतर सदर पदार्थ मेफेड्रोन (MD) असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ६५ हजार रुपये किमतीचे ६.५२० ग्रॅम मेफेड्रोन तसेच ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 Drugs News |
Chandrapur Tiger Attack : आगरझरीत ६० वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०१७/२०२६ नुसार NDPS Act, १९८५ मधील कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद श्यामजी भस्मे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news