Chandrapur news | वरोरा येथे शांतता समितीची बैठक; सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित
Warora peace committee meeting
Warora peace committee meetingPudahri
Published on
Updated on

Warora peace committee meeting

चंद्रपूर : आगामी गणेशोत्सव, ईद आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरोडा येथील सिद्ध विनायक मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, आमदार करण देवतळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बागल, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अभय लोहे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम तसेच विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Warora peace committee meeting
Chandrapur News | वरोरा पोलिस ठाण्यात ‘हरित रक्षक’ अभियानाला सुरुवात

वरोडा शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी सर्व सण शांततेत व उत्साहात साजरे करण्याचे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. सणांच्या काळात नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवादरम्यान डीजेचा वापर, गणेश मंडळांचे नियोजन, मिरवणूक आणि विसर्जनाच्या मार्गांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विसर्जन मार्गावर पुरेसा पोलीस बंदोबस्त, वाहतुकीचे नियोजन आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सण-उत्सवांच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. डीजेचा वापर तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Warora peace committee meeting
Chandrapur news : पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅडसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बागल यांनी प्रास्ताविक केले. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आगामी सर्व सण जातीय सलोख्याने, शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी नागरिक व प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचा संदेश बैठकीत देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news