Chandrapur News | वरोरा पोलिस ठाण्यात ‘हरित रक्षक’ अभियानाला सुरुवात

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन
Warora Police Harit Rakshak Campaign
Warora Police Harit Rakshak Campaign Pudhari
Published on
Updated on

Warora Police Harit Rakshak Campaign

चंद्रपूर : पर्यावरण संवर्धन आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत वरोरा पोलिस ठाण्याच्या परिसरात ‘हरित रक्षक’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ २५ ऑगस्ट रोजी करण्यात आला. जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेड आणि रोटरॅक्ट क्लब यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या वरोरा शहरातील प्रथम आगमनानिमित्त त्यांच्या हस्ते या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

Warora Police Harit Rakshak Campaign
Chandrapur News | वेल्डिंगचे काम करताना उंचावरून पडून कामगाराचा मृत्यू : घुग्घुसमधील लॉयड्स मेटल्सच्या पॉवर प्लांटमध्ये अपघात

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि वरोरा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक असून, त्याच उद्देशाने ‘हरित रक्षक’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. पोलिस ठाण्याच्या परिसरात लावण्यात येणाऱ्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्यावरही विशेष भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी जीएमआर वरोरा एनर्जी लिमिटेडच्या वतीने सहकार्य करण्यात आले. जीएमआर वरोरा येथील आरोग्य, पर्यावरण व सुरक्षा विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक अनुज कुमार तसेच रोटरॅक्ट क्लबचे सदस्य आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Warora Police Harit Rakshak Campaign
Chandrapur Fraud | नोकरी, स्वस्त सोने अन् बनावट नोटांचे आमिष; विनोद सोयाम पोलिसांच्या ताब्यात

‘हरित रक्षक’ अभियानाच्या माध्यमातून पोलिस ठाण्याचा परिसर अधिक हिरवागार करण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news