Chandrapur Accident | मध्यप्रदेशात देवदर्शनाला जाताना कारची कंटेनरला धडक; वरोऱ्यातील वकिलासह दोघांचा मृत्यू , २ जण जखमी

मांगलीसह वरोरा तालुक्यात शोककळा
Car Container Collision Madhya Pradesh Road
वकील राजू हेपट Pudhari
Published on: 
Updated on: 

Car Container Collision Madhya Pradesh Road

चंद्रपूर :  मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील शहापूरजवळ गुरुवारी ( दि. १३) पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात वरोरा तालुक्यातील दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वकील राजू  हेपट आणि राहुल कन्नाके अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या कारची कंटेनरशी जोरदार धडक झाल्याने ही दुर्घटना घडली. अपघातात अन्य दोन मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी राजू हेपट, राहुल कन्नाके आणि त्यांचे मित्र हे वरोरा येथून माँ बगलामुखी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान १३ नोव्हेंबरच्या पहाटे शहापूरजवळ त्यांच्या कारची कंटेनरशी भीषण धडक झाली.

Car Container Collision Madhya Pradesh Road
Chandrapur News | वरोऱ्यातील क्रीडा मैदानाच्या वादाला तात्पुरता विराम; खेळाडूंच्या हिताचा प्रश्न कायम!

धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या मागील बाजूस बसलेले राजू हेपट आणि राहुल कन्नाके यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन मित्र किरकोळ जखमी झाले. दाट धुक्यामुळे अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रवासात मांगली येथील वाहनचालक सूरज ढोके आणि पावडे यांचाही सहभाग होता. देवीच्या दर्शनासाठी आनंदाने सुरू झालेल्या प्रवासाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

राजू भाऊ हेपट हे व्यवसायाने वकील असून त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. सामाजिक क्षेत्रातही त्यांचा अनेकांशी जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांच्या आणि राहुल कन्नाके यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे मांगली गावासह संपूर्ण वरोरा तालुक्यात शोकमय वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.