Nagpur Graduate Constituency Election | वरोऱ्यात पदवीधर मतदानासाठी युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; केंद्रांवर रांगा

वरोरा शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी
Warora Graduate Voting
वरोरा शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळालीPudhari
Published on: 
Updated on: 

Warora Graduate Voting

चंद्रपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वरोरा शहरातील मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या असून, युवकांच्या सहभागामुळे मतदान केंद्रांवरील वातावरण लक्षवेधी ठरले.

या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी, भाजपचे सुधाकर कोहळे आणि अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांच्यासह उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत होत असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Warora Graduate Voting
Nagpur Graduate Constituency voting leave|खासगी आस्थापनांतील मतदारांना आता दोन ऐवजी चार तासांची विशेष सवलत

वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे आणि त्यांच्या पत्नी वेदांती देवतळे यांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच वरोरा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष अर्चनाताई ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मतदान केले.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुशिक्षित मतदारांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे युवकांसह इतर पदवीधर मतदारांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याचे चित्र दिसून आले.

Warora Graduate Voting
Nagpur Graduates Constituency Election | पदवीधर मतदारसंघ निवडणूक: मतदानादिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील 'हे' आठवडी बाजार बंद

दरम्यान, अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांना किती पाठिंबा मिळतो आणि त्याचा निवडणुकीच्या निकालावर काय परिणाम होतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मतदारांचा अंतिम कौल मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news