Chandrapur Fraud | नोकरी, स्वस्त सोने अन् बनावट नोटांचे आमिष; विनोद सोयाम पोलिसांच्या ताब्यात

वरोरा पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून केली अटक
Police Arrest
Police ArrestFile Photo
Published on
Updated on

Warora Vinod Soyam Arrested

चंद्रपूर : नोकरी लावून देण्याचे आमिष, स्वस्त दरात सोने देण्याची बतावणी तसेच पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेला विनोद सोयाम अखेर वरोरा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातील इंदूर येथून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने नागपूरसह विदर्भातील विविध भागांतील नागरिकांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून आर्थिक व्यवहार केले. सरकारी व खासगी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तरुणांकडून पैसे घेणे, स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवणे आणि पैशांची रक्कम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणे, असे प्रकार केल्याचा आरोप आहे.

Police Arrest
Chandrapur Crime News | वरोरा पोलिसांची कारवाई; सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

फसवणुकीनंतर आरोपी फरार झाला होता. तो वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले. वरोरा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सायबर यंत्रणेच्या मदतीने तपास सुरू ठेवला.

ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनीष तालेवार व त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे गतिमान केली. अखेर आरोपी इंदूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.

Police Arrest
Chandrapur crime news | बंद शेडमध्ये आढळला मजुराचा मृतदेह; परिसरात खळबळ

आरोपीने अनेक नागरिकांची मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. त्याच्या माध्यमातून आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

विनोद सोयाम याच्याकडून अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन वरोरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news