Chandrapur Varora cotton thieves arrested |वरोरा तालुक्यात कापूस चोरट्यांचा पर्दाफाश; हिंगणघाटातून दोघांसह बालक ताब्यात

Chandrapur Varora cotton thieves arrested |वरोरा तालुक्यात कापूस चोरट्यांचा पर्दाफाश; हिंगणघाटातून दोघांसह बालक ताब्यात, ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त
theft news
Chandrapur Varora cotton thieves arrested Pudhari photo
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : वरोरा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतातून कापूस चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस पथक, वरोरा यांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे हिंगणघाट (जि. वर्धा) येथे छापा टाकून दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत चोरीचा २५४ किलो कापूस आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा झायलो कार असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये कापूस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हिंगणघाट येथे तातडीने छापा टाकत संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत सागर लक्ष्मण चव्हाण (वय २९, रा. नागरी, ता. वरोरा)  आणि अमोल महादेव जाधव (वय २२, रा. दहेगाव, ता. सेलू, जि. वर्धा; सध्या रा. हिंगणघाट) या दोघांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून २५४ किलो चोरीचा कापूस, अंदाजे किंमत २३ हजार रुपये, तसेच कापसाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा झायलो कार (क्रमांक MH 31 CS 6213), अंदाजे किंमत ५ लाख रुपये, असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

theft news
Chandrapur News : हरवलेली चिमुकली आनंदवन चौक परिसरात होती एकटीच फिरत ; वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत केली वडीलांच्या स्वाधीन!

शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेल्या कापसावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि उपविभागीय पोलीस पथक, वरोरा यांच्या संयुक्त प्रयत्नातून केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

theft news
Chandrapur News| चंद्रपुरात ‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या नागपूर विभागीय प्रादेशिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.