Chandrapur News : हरवलेली चिमुकली आनंदवन चौक परिसरात होती एकटीच फिरत ; वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत केली वडीलांच्या स्वाधीन!

पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे हरवलेल्या मुलीचा शोध
Chandrapur News : हरवलेली चिमुकली आनंदवन चौक परिसरात होती एकटीच फिरत ; वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत केली वडीलांच्या स्वाधीन!
Chandrapur News : हरवलेली चिमुकली आनंदवन चौक परिसरात होती एकटीच फिरत ; वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत केली वडीलांच्या स्वाधीन!
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : वरोरा आनंदवन चौक परिसरात एकटीच फिरत असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला वरोरा पोलिसांनी तत्परता दाखवत सुखरूप तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळे हरवलेल्या मुलीचा शोध लागल्याने पालकांना मोठा दिलासा मिळाला.

आनंदवन चौक परिसरात एक लहान मुलगी एकटीच फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चिमुकलीची विचारपूस केली असता ती आपल्या पालकांपासून दूर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध सुरू केला. या प्रयत्नांना यश येत मुलीचे वडील राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आवश्यक खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी चिमुकलीला सुरक्षितपणे तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले. अचानक मुलगी हरवल्याने चिंतेत असलेल्या पालकांना पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा दिलासा मिळाला. वरोरा पोलिसांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.