चंद्रपूर : ताडोबा पर्यटनासाठी बंद, सोनम वाघिणीच्या दर्शनाने पर्यटक भारावले

चंद्रपूर : आजपासून ताडोबातील कोअर झोनमध्ये पर्यटन बंद !
Chandrapur: Tourism off in the core zone of Tadoba from today!
चंद्रपूर : आजपासून ताडोबातील कोअर झोनमध्ये पर्यटन बंद !Pudhari Photo
Published on
Updated on

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये आज 1 जुलैपासून तीन महिण्यांसाठी पर्यटन बंद करण्यात आले आहे. काल कोअरझोनमध्ये वाघ, वाघिणी व अन्य वन्यप्राण्यांच्या दर्शनासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या दिवशी सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांनी पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले. त्‍यामळे पर्यटकही यामुळे भारावले.

Chandrapur: Tourism off in the core zone of Tadoba from today!
चिपळुणात रस्‍त्‍यावरून मगरीचा मुक्‍त संचार; Video

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द असे स्थळ आहे. दरवर्षी पावसाळ्यात तीन महिण्याकरीता कोअरझोनमधील पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. आज सोमवार पासून कोअर भागात होणारे पर्यटन बंद करण्यात आले. 1 जुलै पासून 30 सप्टेंबरपर्यंत हा पावसाचा काळ असतो. त्यामुळे पर्यटन बंद ठेवले जाते. वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये शिवाय पावसामुळे अंतर्गत भागातील रस्त्यांनी पर्यटन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी दुर्घटनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे कोअर झोनमधील क्षेत्र पर्यटनाकरीता बंद ठेवण्यात येते.

Chandrapur: Tourism off in the core zone of Tadoba from today!
पेपरफुटीला लागणार लगाम?; फडणवीसांनी सांगितला राज्य सरकारचा प्लॅन

पर्यटकांना कोअर झोन पर्यटनासाठी बंद होत असल्याची माहिती असते. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि शेवटच्या दिवशी पर्यटकांची येथे मोठी गर्दी होते. काल रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. वाघ वाघिणींचे दर्शन होईल या आशेने पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना सोनम वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांनी मनसोक्त दर्शन दिले.

Chandrapur: Tourism off in the core zone of Tadoba from today!
Parliament Session 2024|NEET मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग

वन्यजीव छायाचित्रकार श्रीपाद पिंपळापुरे यांनी आपल्या कॅमेऱ्यात सोनम वाघिण व बच्छड्यांची दृश्ये कैद केली. सोनम नावाची वाघिण आपल्या 3 बछड्यांचा लाड करत असल्याचे नयनरम्य दृश्य पर्यटकांना भारावून टाकणारे होते. बच्छड्यांसह वाधिणींचे दर्शन झाल्याने पर्यटकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळाले. शेवटच्या आठवड्यात पर्यटकांची हाऊसफुल्ल् गर्दी झाली होती. आज सोमवार पासून कोअर झोन पर्यटनासाठी बंद झाला आहे. या पूढे पावसाळ्यातीदल 3 महिने 31 जुलै पर्यंत पर्यटकांना ताडोबात नो एन्ट्री असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news