Chandrapur Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात बांबूतोडणी कामगाराचा मृत्यू!

वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगलातील घटना; मध्य प्रदेशातील बालाघाट येथील ६४ वर्षीय मजुराचा मृत्यू
कलामसिंग उईके
कलामसिंग उईके
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात बांबू तोडणी कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगल परिसरात ही घटना घडली. कलामसिंग उईके (वय ६४, रा. बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत कामगाराचे नाव आहे. या घटनेमुळे जंगल परिसरात बांबू तोडणीसह इतर कामे करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कलामसिंग उईके हे बांबू तोडणीच्या कामासाठी जुनोना जंगल परिसरात होते. याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

जंगल परिसरात वाघांचा वावर असल्याने वनक्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना जीव धोक्यात घालून काम करावे लागत आहे.  विशेषतः बांबू तोडणीसारख्या कामांसाठी जंगलात जाणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज  आहे.

दरम्यान, या घटनेप्रकरणी वनविकास महामंडळाच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जंगलात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.